AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा विषयच हार्ड आहे, क्रेझ इतकी की चाहत्यांनी चक्क रात्री…

Vaibhav Sooryavanshi IND vs WI T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु असून या मालिकेच्या तिकिटांच्या खरेदीसाठी चाहत्यांची भलतीच गर्दी केली आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा विषयच हार्ड आहे, क्रेझ इतकी की चाहत्यांनी चक्क रात्री...
| Updated on: Oct 05, 2026 | 11:46 AM
Share

IND vs WI T20: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सामन्यांची मालिका रंगली. या मालिकेत तीन सामने होते त्यातील दोन सामने भारतीय संघाने जिंकले. भारतीय संघाने वनडे मालिका जिंकल्यानंतर आता टी-२० मालिकाही खेळणार आहे. या मालिकेची क्रेझ इतकी आहे की लोक तिकिट खरेदीसाठी स्टेडियमच्या बाहेर रात्रभर झोपले होते.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षकांमधील उत्साह आधीच दिसून येत आहे. पण हा उत्साह केवळ एका सामन्यासाठी आहे संपूर्ण मालिकेसाठी नाही. ९ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या सामन्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात तिकिट खरेदी केली आहे. ९ ऑक्टोबर रोजीचा सामना हा रांची, झारखंडमध्ये रंगणार आहे. सामन्यात वैभव खेळण्याची शक्यता असल्यामुळे चाहते मोठ्या प्रमाणात तिकिट खरेदी करत आहेत. वैभवची क्रेझ संपूर्ण जगभरातच आहे पण रांची आणि बिहारमध्ये जरा जास्त आहे कारण तो तितला लॉकल बॉय आहे. आपल्या ल़ॉकल बॉयला प्रोत्सीहन देण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता धुरवा येथील जेएससीए स्टेडियमबाहेर उभारलेल्या बॅरिकेड्सवर तिकीट खरेदी करण्यासाठी सुमारे ७०० प्रेक्षक जमले होते. रात्रभर थांबून सकाळी तिकीट काउंटर उघडताच तिकीट मिळवण्याच्या आशेने ते तिथे थांबले होते. प्रेक्षक सुमारे दीड तास बॅरिकेड्सवर उभे होते. हे कळताच, धुरवा पोलीस स्टेशनचे पोलीस आणि डीएसपी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना बॅरिकेड्सवरून हटवले. त्यांच्यापैकी बऱ्याच जणी महिला होत्या, ज्यापैकी अनेकींनी रात्रभर थांबून सकाळी तिकीट मिळवण्यासाठी चटया आणि चादरी आणल्या होत्या.

बॅरिकेड्सवरून हटवल्यानंतरही अनेक प्रेक्षक स्टेडियमजवळच थांबले होते. काही जण झाडांखाली, काही दुकानांजवळ रेंगाळत होते, तर काही जण सकाळची वाट पाहत आपापल्या गाड्यांमध्ये थांबले होते. तिकिटे खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये झारखंड तसेच बिहारच्या विविध जिल्ह्यांतील क्रिकेट चाहत्यांचा समावेश होता.

प्रेक्षकांनी सामन्याबद्दल आपला उत्साह व्यक्त केला. म्हणूनच तिकिटे मिळवण्यासाठी ते एक दिवस आधीच रांचीला पोहोचले होते. त्यांना आशा होती की रात्रभर रांगेत उभे राहिल्यामुळे सकाळी तिकीट काउंटर उघडताच तिकिटे मिळणे सोपे होईल.

Follow Us
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?