काय सांगता! चक्क स्टेडियममध्ये जाऊन मोफत टीम इंडियाची मॅच पाहता येणार, फ्रीमध्ये मिळणार तिकिट
IND vs ZIM T20: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका आजपासून सुरू होत आहे. हे सामन्या्ंची तिकीट मोफत मिळणार आहे.

IND vs ZIM T20: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका आजपासून सुरू होत आहे. तिन्ही सामने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर स्मृती मंधानाची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. या मालिकेसाठी महिला प्रेक्षकांना प्रवेश पूर्णपणे मोफत असेल. आयएएनएसच्या वृत्तानुसार, राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
एका सूत्राने सांगितले, “नवरात्रीसुद्धा सुरू आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना मोठ्या संख्येने महिला प्रेक्षक उपस्थित राहिल्यास रायपूरमधील उत्सवाचे वातावरण अधिकच वाढेल. गुरुवारी जेव्हा मुख्यमंत्र्यांना सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते, तेव्हा त्यांनी महिला चाहत्यांसाठी तिकिटे मोफत असेल अशी घोषणा केली. ”
View this post on Instagram
नवरात्री सुरू असल्याने, मोफत तिकिटांमुळे मोठ्या संख्येने महिला चाहते स्टेडियमकडे आकर्षित होतील, अशी संघटनेला आशा आहे. संघटनेने गुरुवारी ही अधिकृत घोषणा केली आणि महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येऊन प्रेक्षक गॅलरी भरवण्याचे आवाहन महिला चाहत्यांना केले.
स्मृती मंधानाची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. पहिला सामना आज, दुसरा १८ ऑक्टोबरला आणि तिसरा २० ऑक्टोबरला खेळला जाईल. हे तिन्ही सामने रायपूरमध्ये होणार आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट संघही सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील आता फक्त एक सामना शिल्लक राहिला आहे. मालिकेत दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीत आहे. शेवटचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे.
भारतीय महिला टी२० संघ
स्मृति मंधाना (कर्णधार), हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा, अरुंधति रेड्डी, मिन्नू मणी, शेफाली वर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), नंदनी शर्मा, अनुष्का शर्मा, क्रांति गौड, मोनी कलिता, श्री चरणी, निकी प्रसाद, कमलिनी (विकेटकीपर), प्रेमा रावत.
