AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mithali Raj : मिताली राजने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी जागतिक महिला क्रिकेटमधील एकमेव खेळाडू…!

मिताली राज हिने (Mithali Raj) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. मिताली महिला क्रिकेटर्समध्ये 7 हजार धावा करणारी पहिलीच क्रिकेटर आहे. Mithali Raj 7000 Runs ODI Cricket

Mithali Raj : मिताली राजने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी जागतिक महिला क्रिकेटमधील एकमेव खेळाडू...!
मिताली राज
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 14, 2021 | 12:57 PM
Share

मुंबई : भारतीय महिला संघाचा (Indian Women Cricket team) कणा असलेली मिताली राज हिने (Mithali Raj) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. मिताली महिला क्रिकेटर्समध्ये 7 हजार धावा करणारी पहिलीच क्रिकेटर आहे. 1999 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मितालीने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. या विक्रमानंतर आता मितालीने पुन्हा एकदा दुसऱ्या विक्रमाला गवसणी घातलीय.(indian Women Cricketer mithali Raj 7000 Runs One Day Cricket)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यात मितालीने आपल्या वनडे कारकीर्दीतील 7 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. या मॅचमध्ये 45 धावांची सुंदर खेळी करत तिने हा विक्रम आपल्या नावे केलाय. वनडे सर्वाधिक रन्स करणाऱ्या महिला फलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्स आहे.

इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्सच्या नावावर 5992 रन्स आहेत. महिला क्रिकेटमध्ये मितालीने सर्वप्रथम 6000 आणि 7000 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ज्यावेळी तिने 6000 धावा केल्या होत्या तेव्हा तर जागतिक महिला क्रिकेटमध्ये ती अशी एकमेव खेळाडू होती की जिच्या नावावर 6 हजार धावांची नोंद होती.

मिताली राज- भारतीय महिला टीमच्या पाठीचा कणा 

भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राज नावाचं वादळ गेल्या दोन दशकांपासून घोंघावत आहे. 1999 मध्ये तिने क्रिकेट विश्वात पदार्पण केलं तेव्हापासून तिने आजतागायत पाठीमागे वळून पाहिलं नाही. ओपनिंग येऊन तिने खोऱ्याने रन्स केले, कर्णधार म्हणून भारताचा तिरंगा जगात फडकवला तर मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला कित्येक वेळा हाराकिरी पत्करायला लावली.

मितालीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज दुसरी महिला फलंदाज आहे. मितालीने 311 वी मॅच खेळताना ही कमाल केली आहे. तिने आतापर्यंतच्या आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 75 अर्धशतक ठोकलीत तसंच तिच्या नावावर 8 शतके देखील आहेत.

मितालीअगोदर इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स हिने 10 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय. तिने 309 मॅचमध्ये 10 हजार 273 रन्स केले. यामध्ये 67 अर्धशतकांसह 13 शतकांचा समावेश आहे.

मितालीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा

मितालीने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेमधील 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारी ती मिताली दुसरी महिला बॅट्समन ठरली आहे. साऊथ आफ्रिकेविरोधातल्या तिसऱ्या मॅचमध्ये तिने ही अजोड कामगिरी केलीय. प्रत्येक भारतीय तिच्या या यशावर गर्व करतोय.

हे ही वाचा :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 रन्स, मिताली राजच्या नावावर खास विक्रम

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया