AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 रन्स, मिताली राजच्या नावावर खास विक्रम

भारतीय महिला संघाचा (Indian Women Cricket team) कणा असलेली मिताली राज हिने (Mithali Raj ) आंतरराष्ट्रीय क्रिकेमधील 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 रन्स, मिताली राजच्या नावावर खास विक्रम
मिताली राज
| Updated on: Mar 12, 2021 | 1:49 PM
Share

मुंबईभारतीय महिला संघाचा (Indian Women Cricket team) कणा असलेली मिताली राज हिने (Mithali Raj ) आंतरराष्ट्रीय क्रिकेमधील 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारी ती मिताली दुसरी महिला बॅट्समन ठरली आहे. साऊथ आफ्रिकेविरोधातल्या तिसऱ्या मॅचमध्ये तिने ही अजोड कामगिरी केलीय. प्रत्येक भारतीय तिच्या या यशावर गर्व करतोय. (Mithali Raj international Cricket 10 Housand Runs Became 2nd batsman)

भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राज नावाचं वादळ गेल्या दोन दशकांपासून घोंघावत आहे. 1999 मध्ये तिने क्रिकेट विश्वात पदार्पण केलं तेव्हापासून तिने आजतागायत पाठीमागे वळून पाहिलं नाही. ओपनिंग येऊन तिने खोऱ्याने रन्स केले, कर्णधार म्हणून भारताचा तिरंगा जगात फडकवला तर मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला कित्येक वेळा हाराकिरी पत्करायला लावली.

भारताचा साऊथ आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात तिने 50 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 36 रन्स केल्या. याचसोबत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

मितालीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज दुसरी महिला फलंदाज आहे. मितालीने 311 वी मॅच खेळताना ही कमाल केली आहे. तिने आतापर्यंतच्या आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 75 अर्धशतक ठोकलीत तसंच तिच्या नावावर 8 शतके देखील आहेत.

मितालीअगोदर इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स हिने 10 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय. तिने 309 मॅचमध्ये 10 हजार 273 रन्स केले. यामध्ये 67 अर्धशतकांसह 13 शतकांचा समावेश आहे.

एडवर्डस आणि मितालीच्या 10 हजार रन्समध्ये 3 समानता

महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दोनच महिला खेळाडूंनी 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. एक म्हणजे एडवर्डस आणि दुसरी म्हणजे मिताली राज… या दोघींमध्ये तीन समानता आहेत.

1) दोघींनीही साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपल्या 10 धावांचा टप्पा ओलांडला. 2)दोघांनीही दहा हजार धावा पार करताना आफ्रिकेची लौरा पदार्पण करत होती. तुम्ही म्हणाल कसं काय तर एडवर्डसने 10 हजार धावा पार केल्या तेव्हा लौराने एका सिरीजच्या निमित्ताने डेब्यू केला होता. तर मितालीने 10 हजार धावा करताना लौराने कर्णधार म्हणून डेब्यू केलाय किंबहुना कर्णधारपदाची सूत्रं हातात घेतली आहेत. 3) तिसरी आणि शेवटची समानता म्हणजे दोघींनीही 10 हजार धावांचा टप्पा गाठताना चौकार मारत विक्रमाला गवसणी घातलीय.

(Mithali Raj international Cricket 10 Housand Runs Became 2nd batsman)

हे ही वाचा :

Video : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थाटात विजय, भारतीय महिला खेळाडूंचे तमीळ गाण्यावर ठुमके, डान्समध्ये कोण-कोण?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.