R praggnanandhaa: भारताच्या 16 वर्षाच्या मुलाने वर्ल्ड चेस चॅम्पियन मॅगनस कार्लसनला दिला जोरदार झटका

R praggnanandhaa: भारताच्या 16 वर्षाच्या मुलाने वर्ल्ड चेस चॅम्पियन मॅगनस कार्लसनला दिला जोरदार झटका
R Praggnanandhaa
Image Credit source: ANI

चेसेबल मास्टर्स ऑनलाइन रॅपिड चेस स्पर्धेचा दुसऱ्यादिवसाचा खेळ संपला. कार्लसन दुसऱ्या स्थानावर आहे. चीनचा के.वी यी या स्पर्धेत पहिल्या स्थानावर आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 21, 2022 | 4:19 PM

मुंबई: भारताचा 16 वर्षाचा युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंधा रमेशबाबुने वर्ल्ड चॅम्पियन मॅगनस कार्लसनला (magnus carlsen) जोरदार झटका दिला आहे. कार्लसन तीन महिन्यात दुसऱ्यांदा भारताच्या या सोळा वर्षाच्या युवा ग्रँडमास्टरकडून पराभूत झाला आहे. चेसेबल मास्टर्स ऑनलाइन रॅपिड चेस स्पर्धेत (chess Tournament) प्रज्ञानंधाने (praggnanandhaa) शुक्रवारी हा पराक्रम करुन दाखवला. वर्ल्ड चॅम्पियन मॅगनस कार्लसनला हरवणं, ही साधीसुधी बाब नाहीय. पाचव्या राऊंड मध्ये ड्रॉ च्या दिशेने सामना चालला होता. पण वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनकडून एक चूक झाली. तिथेच त्याचा पराभव निश्चित झाला. विजयानंतरही प्रज्ञानंधा आनंदी नाहीय. मला तशा पद्धतीने जिंकायचं नव्हतं, असं प्रज्ञानंधा सामना संपल्यानंतर म्हणाला. मॅगनस कार्लसनच्या एका मोठ्या चुकीमुळे प्रज्ञानंधाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

लहान ग्रँडमास्टर अभिमन्यू मिश्राही स्पर्धेत

चेसेबल मास्टर्स ऑनलाइन रॅपिड चेस स्पर्धेचा दुसऱ्यादिवसाचा खेळ संपला. कार्लसन दुसऱ्या स्थानावर आहे. चीनचा के.वी यी या स्पर्धेत पहिल्या स्थानावर आहे. प्रज्ञानंधाकडे 12 पॉइंट्स आहेत. जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर अभिमन्यू मिश्राही या स्पर्धेत आहे.

कार्लसन-प्रज्ञानंधाच्या वयामध्ये मोठं अंतर

याआधी तीन महिन्यांपूर्वी एयरथिंग्स मास्टर्समध्ये प्रज्ञानंधाने कार्लसनला हरवलं होतं. कार्लसन आणि प्रज्ञानंधाच्या वयामध्ये मोठं अंतर आहे. कार्लसन 31 वर्षांचा आहे. एयरथिंग्स मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टरने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना वर्ल्ड नंबर 1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवलं. चेन्नईच्या प्रज्ञानंधाने दिग्गजांना हैराण करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी 2018 मध्ये त्याने इतिहास रचला आहे. त्यावेळी प्रज्ञानंधाने जगातील दुसरा युवा चेस ग्रँड मास्टर बनला होता.

प्रज्ञानंधाचा जन्म 10 ऑगस्ट 2005 मध्ये झाला

प्रज्ञानंधा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे त्याने चेस खेळू नये असं वडिलांच मत होतं. पण प्रज्ञानंधाची बहिण चेस खेळायची. तिला खेळताना पाहून प्रज्ञानंधाची चेसमध्ये रुची वाढली. त्यामुळेच तो आज इथवर पोहोचू शकला. प्रज्ञानंधाचा जन्म 10 ऑगस्ट 2005 मध्ये चेन्नईत झाला होता. आरबी रमेश त्याचे कोच आहेत. 16 वर्षाच्या प्रागननंदने 40 देशांचा दौरा केला आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें