IPL 2020, KKR vs RR : कोलकाताचा राजस्थानवर 60 धावांनी शानदार विजय

कोलकाताने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

IPL 2020, KKR vs RR : कोलकाताचा राजस्थानवर 60 धावांनी शानदार विजय
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 11:51 PM

दुबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 60 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थानचे आव्हान संपुष्ठात आलं आहे. कोलकाताने राजस्थानला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 131 धावाच करता आल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 35 धावा केल्या. तसेच राहुल तेवतियाने 31 धावांची खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्थीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.कमलेश नागरकोटीने 1 बळी घेतला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानला कोलकाताने सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. यानंतर राजस्थानने सातत्याने विकेट्स गमावले. कोलकाताच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थाच्या कोणत्याही फलंदाजाला मोठा आकडा गाठता आला नाही. राजस्थानच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजीसमोर लोटांगण घातलं. रॉबिन उथप्पा 6 धावांवर बाद झाला. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स 18 रन्सवर आऊट झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथला विशेष काही करता आले नाही. स्मिथ 4 धावा करुन माघारी परतला. संजू सॅमसन आजही अपयशी ठरला. रियान परागला भोपळाही फोडता आला नाही.

जोस बटलरने मोठी खेळी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. बटलरला वरुण चक्रवर्थीने 35 धावांवर माघारी पाठवलं. बटलरने 22 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 35 धावा केल्या. राहुल तेवतियाने 27 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चर 6 धावांवर तंबूत परतला. तर कार्तिक त्यागीला शिवम मावीने स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केलं.

त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. कोलकाताकडून मॉर्गनने सर्वाधिक धावा केल्या. मॉर्गनने 35 चेंडूत 6 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने 39 तसेच शुभमन गिलने 36 धावा केल्या. आंद्रे रसेलने 11 चेंडूत 25 धावांची आक्रमक खेळी केली. कोलकाताच्या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. नितीश राणा, सुनील नारायण आणि दिनेश कार्तिक हे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले.

राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कार्तिक त्यागीने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 1 विकेट घेतला. या पराभवामुळे राजस्थानी पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर कोलकाताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

ipl 2020 kkr vs rr live score update today cricket match kolkata knight riders vs rajasthan royals live लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”कोलकाताचा शानदार विजय” date=”01/11/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला नववा धक्का” date=”01/11/2020,11:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला आठवा धक्का” date=”01/11/2020,11:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला सातवा धक्का” date=”01/11/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला सहावा धक्का” date=”01/11/2020,10:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर राजस्थान” date=”01/11/2020,10:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रियान पराग बाद, राजस्थानचा अर्धा संघ तंबूत” date=”01/11/2020,10:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला चौथा धक्का” date=”01/11/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला तिसरा धक्का” date=”01/11/2020,9:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विकेटकीपर दिनेश कार्तिकची भन्नाट कॅच, बेन स्टोक्स आऊट, राजस्थानला दुसरा धक्का” date=”01/11/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का” date=”01/11/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात” date=”01/11/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 192 धावांचे आव्हान” date=”01/11/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”इयोन मॉर्गनचे अर्धशतक” date=”01/11/2020,9:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला सहावा धक्का” date=”01/11/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 14 ओव्हरनंतर” date=”01/11/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पाचवा धक्का” date=”01/11/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला चौथा धक्का” date=”01/11/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची तिसरी विकेट” date=”01/11/2020,8:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला दुसरा धक्का” date=”01/11/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल-राहुल त्रिपाठी जोडीची अर्धशतकी भागीदारी” date=”01/11/2020,8:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”01/11/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान आणि कोलकाताचे अंतिम 11 खेळाडू” date=”01/11/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानने टॉस जिंकला” date=”01/11/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

राजस्थान आणि कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या क्रमांकावर आहेत. राजस्थान आणि कोलकाता या दोन्ही संघाचे गुण प्रत्येकी 12 आहेत. त्यामुळे या मोसमातील प्ले ऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक असणार आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. याआधी दोन्ही संघ या मोसमात 30 सप्टेंबरला भिडले होते. या सामन्यात कोलकाताने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला होता.

कोलकाता नाइट रायडर्स : इयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, टॉम बॅंटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरॉन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात

ipl 2020 kkr vs rr live score update today cricket match kolkata knight riders vs rajasthan royals live

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.