IPL 2020, RCB vs CSK : ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी, चेन्नईची बंगळुरुवर 8 विकेट्सने मात

| Updated on: Oct 25, 2020 | 7:07 PM

चेन्नईचा या मोसमातील हा चौथा विजय ठरला.

IPL 2020, RCB vs CSK : ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी, चेन्नईची बंगळुरुवर 8 विकेट्सने मात
Follow us on

दुबई : चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Banglore) 8 विकेट्सने मात केली आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 146 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 2 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले. चेन्नईने 150 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. बंगळुरुकडून ख्रिस मॉरीस आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. IPL 2020 RCB vs CSK Live Score Update Today Cricket Match Royal Challengers Banglore vs Chennai Super Kings Live लाईव्ह स्कोअर

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी फॅफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी 46 धावा जोडल्या. त्यानंतर फॅफ 25 धावांवर बाद झाला. त्याने 25 धावांच्या खेळीत 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. फॅफनंतर अंबाती रायुडू मैदानात आला. रायुडू आणि गायकवाड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या जोडीने मैदानात जम बसवला. मात्र युझवेंद्र चहलने रायुडूला 39 धावांवर बोल्ड केलं. रायुडूने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.

रायुडू बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. यादरम्यान ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनीने चेन्नईला विजयी आव्हानापर्यंत पोहचवले. धोनीने 21 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. त्याने यामध्ये 3 फोर लगावले. तर ऋतुराजने 51 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 सिक्स आणि 4 फोर लगावले.

त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुने 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 145 धावा केल्या. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर एबी डी व्हीलियर्सने 39 धावांची खेळी केली. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

बॅटिंगला आलेल्या बंगळुरुची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी अॅरॉन फिंच-देवदत्त पडीक्कलने 37 धावा जोडल्या. बंगळुरुला पहिला धक्का अॅरॉन फिंचच्या रुपात लागला. फिंचने 15 धावा केल्या. त्यानंतर 7 व्या ओव्हरच्या पहिल्या बोलवर देवदत्त पडीक्कल 22 धावांवर बाद झाला. पडीक्कलला चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला या खेळीची मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. पडीक्कल बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आणि एबी डी व्हीलियर्सने तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी तोडायला दीपक चहरला यश आले. एबी 39 धावा करुन माघारी परतला.

एबी माघारी गेल्यानंतर काही चेंडूनंतर मोईन अली 1 धावेवर आऊट झाला. यानंतर कर्णधार कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर कोहलीही आऊट झाला. विराटने 43 चेंडूत 1 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 50 धावा केल्या. विराटनंतर ख्रिस मॉरीसही 2 धावांवर आऊट झाला. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चहरने 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सॅंटनरला 1 विकेट घेण्यास यश आले.

[svt-event title=”ऋतुराजचे अर्धशतक” date=”25/10/2020,6:31PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”25/10/2020,6:30PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”12 ओव्हरनंतर चेन्नई” date=”25/10/2020,6:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”25/10/2020,6:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर चेन्नई” date=”25/10/2020,5:52PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला पहिला धक्का” date=”25/10/2020,5:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 3 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,5:32PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,5:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”25/10/2020,5:19PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 146 धावांचे आव्हान” date=”25/10/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=” बंगळुरुला सहावा धक्का” date=”25/10/2020,5:02PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुचा अर्धा संघ तंबूत” date=”25/10/2020,4:58PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”विराटचे अर्धशतक” date=”25/10/2020,4:56PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का” date=”25/10/2020,4:53PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला तिसरा धक्का” date=”25/10/2020,4:50PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरु 16 ओव्हरनंतर, विराट-एबी मैदानात” date=”25/10/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहली- एबी डी व्हीलियर्सची अर्धशतकी भागीदारी ” date=”25/10/2020,4:31PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरु 12 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,4:26PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”10 षटकांनंतर बंगळुरुच्या धावा” date=”25/10/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”25/10/2020,4:13PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”25/10/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”25/10/2020,4:01PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”5 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”25/10/2020,3:56PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”25/10/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”3 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”25/10/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”2 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”25/10/2020,3:41PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात” date=”25/10/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”25/10/2020,3:24PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अशी आहे चेन्नईची टीम” date=”25/10/2020,3:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन टीम” date=”25/10/2020,3:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुने टॉस जिंकला” date=”25/10/2020,3:03PM” class=”svt-cd-green” ]

आमनेसामने

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. या 25 पैकी 15 सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे. तर बंगळुरुला 9 सामन्यात यश आलं आहे.

बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरुने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. बंगळुरुचा यापैकी 7 सामन्यात विजय तर 3 मॅचमध्ये पराभव झाला आहे. चेन्नईचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारण्याचा प्रयत्न बंगळुरुचा असेल. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईची यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. चेन्नईने या हंगामात एकूण 11 सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे तर 8 मॅचेसमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs RCB : विराटच्या बंगळुरुकडून धोनीच्या किंग्जसवर 37 धावांनी मात

IPL 2020 RCB vs CSK Live Score Update Today Cricket Match Royal Challengers Banglore vs Chennai Super Kings Live