AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : एकाच जागेवर येऊन उभे राहिले दोघेही फलंदाज, दीपक हुड्डा विचित्र पद्धतीने रनआऊट, पाहा Video

दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यादरम्यान एका रन्सआऊटची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. पंजाबचा आक्रमक खेळाडू दीपक हुडा विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. (IPL 2021 Dc vs PBKS Dipak Hooda Run Out Viral Video)

IPL 2021 : एकाच जागेवर येऊन उभे राहिले दोघेही फलंदाज, दीपक हुड्डा विचित्र पद्धतीने रनआऊट, पाहा Video
दीपक हुड्डा विचित्र पद्धतीने Run-Out
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 03, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : मयांक अग्रवालची (Mayank Agrawal) नाबाद 99 रन्सची खेळी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) 69 रन्ससमोर फिकी पडली. धवनच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबला 7 विकेट्सने हरवलं. सामन्यादरम्यान एका रन्सआऊटची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. पंजाबचा आक्रमक खेळाडू दीपक हुडा (Dipak Hooda) विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. शिमरन हेटमायरने (Shimron hetmyer) शानदार अंदाजात दीपक हुडाला रनआऊट केलं. सोशल मीडियावर हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. (IPL 2021 Dc vs PBKS Dipak Hooda Run Out Viral Video)

दीपक हुडा नेमका कसा रन आऊट झाला?

13 व्या ओव्हरनंतर पंजाबच्या 88 रन्सवर 3 विकेट पडल्या होत्या. 14 व्या ओव्हरला अक्षर पटेल बोलिंगसाठी बोलिंग मार्कवर आला. त्याच्या बॉलवर मयांक अग्रवालने शॉट्स खेळला आणि रन्स घेण्यासाठी धावला. त्याच्या जोडीला दीपक हुडा होता. दोघेही रन्स घेण्यासाठी धावले पण हेटमायरने चांगली फिल्डिंग केली. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला दीपक हुडा रन्स घेण्यासाठी धावला खरा पण हेटमायरच्या हातात बॉल पाहून तो माघारी वळला.

तोपर्यंत मयांक अग्रवालने नॉन स्ट्रायकर एंड गाठलं होतं. दोघेही नॉन स्ट्रायकर एंडलाच होते. साहजिकच हेटमायरने बोलर अक्षय पटेलकडे थ्रो केला. त्याने स्टम्पला बॉल लावला, बेल्स पाडले आणि स्ट्रायकर इंडला म्हणजेच कीपर रिषभ पंतकडे थ्रो केला. त्याने त्याचं काम फत्ते केलं.

अंपायरलाही प्रश्न पडला, नेमकं आऊट कोण?

परंतु नेमकं आऊट कोण झालं, असा अंपायरलाही प्रश्न पडला. थर्ड अंपायरनेही बऱ्याच वेळा चेक केलं. बराच वेळ घेतल्यानंतर थर्ड अंपायरने अखेर दीपक हुडाला रन्स  आऊट घोषित केलं.

फॉर्मात असलेल्या दिल्लीने पंजाबला हरवलं!

शिखर धवनच्या धमाकेदार 69 रन्सच्या बळावर दिल्लीने पंजाबला 7 विकेट्सने नमवलं. तसंच गुणतालिकेतही शिखर गाठलं. दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम पंजाबला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पंजाबला 166 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले. शिखर धववने शानदार खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

(IPL 2021 DC vs PBKS Kagi

(IPL 2021 Dc vs PBKS Dipak Hooda Run Out Viral Video)

हे ही वाचा :

IPL 2021 : रबाडाच्या एक्सप्रेसने गेलच्या गाडीला ब्रेक, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मानलं भावा तुला…!’

IPL 2021 : ‘विराटसेना’ निळा ड्रेस घालून मैदानात उतरणार, कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचा ‘बंगळुरु’ पॅटर्न!

IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली