IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज

IPL 2021, Purple Cap | आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते.

IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज
IPL 2021, Purple Cap | आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते.
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 12:03 AM

अहमदाबाद | आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमात रविवारी (2 मे) दुहेरी सामन्यांचा थरार रंगला. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 167 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 17.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या 29 सामन्यानंतर कोणत्या गोलंदाजाकडे पर्पल कॅप (Purple Cap) आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. (ipl 2021 dc vs pbks points table 2021 standings ranking purple cap after delhi capitals vs punjab kings on 2nd may in marathi)

बंगळुरुच्या हर्षल पटेलकडे पर्पल कॅप

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. 29 व्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल पर्पल कॅप राखण्यात यशस्वी ठरला आहे. हर्षल पटेलने (Harshal Patel) या मोसमात आतापर्यंत 7 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. एका बाजूला हर्षल पटेलने पर्पल कॅप कायम राखली आहे. तर दुसऱ्या बाजूला या कॅपसाठी बाकी गोलंदाजांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे.

ख्रिस मॉरीस विरुद्ध अवेश खान आमनेसामने

या पर्पल कॅपसाठी दिल्लीचा आवेश खान (Avesh Khan) आणि राजस्थान रॉयल्सचा ख्रिस मॉरिस (Chris Morris) यांच्यामध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. आवेशच्या नावावर 8 मॅचमध्ये 14 विकेट्स आहेत. तर ख्रिस मॉरीसने 7 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणता गोलंदाज हर्षल पटेलला पछाडत पर्पल कॅप पटकावणार याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

पर्पल कॅपसाठी शर्यतीतील टॉप 5 बोलर्स

हर्षल पटेल, बंगळुरु, 7 मॅच 17 विकेट्स

आवेश खान, दिल्ली, 8 मॅच, 14 विकेट्स

ख्रिस मॉरिस, राजस्थान, 7 मॅच, 14 विकेट्स

राहुल चाहर, मुंबई, 7 मॅच, 11 विकेट्स

राशिद खान, हैदराबाद, 7 मॅच, 9 विकेट्स

दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर

दिल्लीने पंजाब किंग्सला पराभूत केलं. यासह दिल्लीने विजयी षटकार लगावला आहे. दिल्लीचा या मोसमातील हा सहावा विजय ठरला. यासह दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये 12 पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या :

PBKS vs DC IPL 2021 Match 29 | धवनची अर्धशतकी ‘गब्बर’ खेळी, पंजाबवर 7 विकेट्सने शानदार विजय, पॉइंट्स टेबलमध्ये गाठलं ‘शिखर’

RR vs SRH IPL 2021 Match 28 | राजस्थानचा सनरायजर्स हैदराबादवर 55 धावांनी ‘रॉयल’ विजय

(ipl 2021 dc vs pbks points table 2021 standings ranking purple cap after delhi capitals vs punjab kings on 2nd may in marathi)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.