AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला झटका, सलामीवीराला कोरोनाची लागण

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाला केवळ पाच दिवस शिल्लक आहेत, पण या लीगवरील कोरोनाचा धोका संपण्याचं नाव घेत नाही.

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला झटका, सलामीवीराला कोरोनाची लागण
Devdutt Padikkal
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 04, 2021 | 11:32 AM
Share

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाला केवळ पाच दिवस शिल्लक आहेत, पण या लीगवरील कोरोनाचा धोका संपण्याचं नाव घेत नाही. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्सनंतर आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघालादेखील कोरोनाचा फटका बसला आहे. आरसीबीचा स्टार युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देवदत्तला उर्वरित संघापासून वेगळे करत आयसोलेट करण्यात आले आहे. (IPL 2021: Devdutt Padikkal becomes third cricketer to contract COVID-19)

आरसीबीचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. पण आता देवदत्तचे त्या सामन्यात खेळणे कठीण झाले आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात देवदत्त आरसीबीसाठी एक मोठा स्टार खेळाडू म्हणून समोर आला होता. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना त्याने चमकदार कामगिरी केली होती. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात देवदत्तचा मोठा वाटा होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याने संघासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे.

पडिक्कलला आयसोलेट

पडिक्कलला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येताच त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. बँगलोरचा संघ सध्या चेन्नईमध्ये असून पहिल्या आयपीएलमधील पहिल्या सामन्याची तयारी करत आहे. स्पर्धेतील पहिला सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आरसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन सामन्यात देवदत्तचे खेळणे फार अवघड आहे. गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या पडिक्क्कलने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आणि आरसीबीकडून सर्वाधिक धावा केल्या. देवदत्त पडिक्क्कलने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये त्याच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.

अक्षर पटेलदेखील कोरोनाबाधित

दरम्यान, काल (3 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला पहिला सामना 10 एप्रिल रोजी मुंबईत खेळणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाचा कोरोनो रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. परंतु त्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या संघात सहभागी झाला आहे.

पडीक्कलची आयपीएलमधील कामगिरी

आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सर्वात जास्त धावा देवदत्तने फटकावल्या होत्या. त्याने या बाबतीत कर्णधार विराट कोहली आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सलादेखील मागे ठेवले होते. IPL 2020 मध्ये पडीक्कलला 15 सामन्यांमध्ये आरसीबी संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 5 अर्धशतकांच्या तब्बल 473 धावा फटकावल्या होत्या.

देवदत्तची विजय हजारे करंडक स्पर्धेतील कामगिरी

देवदत्तने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा चोपल्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने 4 शतकं सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.

फॉरमॅट
सामने
डाव
नाबाद
धावा
हायस्कोर
सरासरी
BF
CT
SR
100s
50s
Firts Class
15
29
3
907
99
34.88
1794
6
50.55
0
10
List A
20
20
4
1387
152
86.68
1597
32
86.5
6
9
T-20
33
33
4
1271
122
43.82
871
50
145.92
1
11

संबंधित बातम्या

Devdutt Padikkal IPL 2021 RCB Team Player : IPL 2020 आणि विजय हजारे स्पर्धा गाजवणारा देवदत्त पडीक्कल पुन्हा धुमाकूळ घालणार?

175 चौकार आणि 46 षटकार, 2 फलंदाजांचा झंझावात, 1500 पेक्षा अधिक धावा, तरीही संघात स्थान नाही

(IPL 2021: Devdutt Padikkal becomes third cricketer to contract COVID-19)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...