Devdutt Padikkal IPL 2021 RCB Team Player : IPL 2020 आणि विजय हजारे स्पर्धा गाजवणारा देवदत्त पडीक्कल पुन्हा धुमाकूळ घालणार?

राष्ट्रीय स्तरावर कर्नाटक संघाकडून खेळणाऱ्या देवदत्त पडीक्कलने गेल्या दोन वर्षांमध्ये देशभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Devdutt Padikkal IPL 2021 RCB Team Player : IPL 2020 आणि विजय हजारे स्पर्धा गाजवणारा देवदत्त पडीक्कल पुन्हा धुमाकूळ घालणार?
Devdutt Padikkal
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 4:05 PM

मुंबई : आयपीएलमधील अनेक संघांनी राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंमधील गुण ओळखून त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे घडवलं आहे. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अंबाती रायुडू, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी. नटराजन ही त्यापैकी काही नावं आहेत. आगामी काळात यात अजून एक नाव पाहायला मिळू शकतं. ते नाव म्हणजे देवदत्त पडीक्कल.

राष्ट्रीय स्तरावर कर्नाटक संघाकडून खेळणाऱ्या या तरुण खेळाडूने गेल्या दोन वर्षांमध्ये देशभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या वर्षीची आयपीएल (IPL 2020) स्पर्धा आणि नुकतीच पार पडलेली विजय हजारे करंडक स्पर्धादेखील त्याने गाजवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये देवदत्त गेल्या दोन वर्षांपासून खोऱ्याने धावा जमवतोय. त्यामुळे लवकरच त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जातील, असं बोललं जात आहे.

पडीक्कलची आयपीएलमधील कामगिरी

आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सर्वात जास्त धावा देवदत्तने फटकावल्या होत्या. त्याने या बाबतीत कर्णधार विराट कोहली आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सलादेखील मागे ठेवले होते. IPL 2020 मध्ये पडीक्कलला 15 सामन्यांमध्ये आरसीबी संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 5 अर्धशतकांच्या तब्बल 473 धावा फटकावल्या होत्या.

विजय हजारे करंडक स्पर्धेतील कामगिरी

देवदत्तने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा चोपल्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने 4 शतकं सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.

फॉरमॅट
सामने
डाव
नाबाद
धावा
हायस्कोर
सरासरी
BF
CT
SR
100s
50s
Firts Class
15
29
3
907
99
34.88
1794
6
50.55
0
10
List A
20
20
4
1387
152
86.68
1597
32
86.5
6
9
T-20
33
33
4
1271
122
43.82
871
50
145.92
1
11

संबंधित बातम्या

Glenn Maxwell IPL 2021 RCB Team Player : आंतरराष्ट्रीय T-20 मधल्या हिरोचा आयपीएलमध्ये फ्लॉप शो, तरीही कोट्यवधींची बोली

Ab De Villiers IPL 2021 RCB Team Player : टी-20 क्रिकेटचा बादशाह एबी डिव्हीलियर्सचा आयपीएलमध्येही जलवा, मात्र जेतेपदापासून लांब

Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल

(Devdutt Padikkal IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.