AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer Injury : ना रहाणे, ना स्मिथ, ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार

टीम इंडियामधील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. श्रेयसची ही दुखापत भारतीय संघ आणि श्रेयस अय्यरसाठी मोठा झटका आहे

Shreyas Iyer Injury : ना रहाणे, ना स्मिथ, 'हा' असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार
Delhi Capitlas
| Updated on: Mar 25, 2021 | 5:56 PM
Share

पुणे : भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण टीम इंडियामधील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त (Shreyas Iyer Injury) झाला आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचे वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, श्रेयसची ही दुखापत भारतीय संघ आणि श्रेयस अय्यरसाठी मोठा झटका आहेच, सोबत आयपीएलमधील गतवर्षीचा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्ससाठीदेखील हा खूप मोठा धक्का आहे. कारण श्रेयस आयपीएलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतोय. (Shreyas Iyer Injury : Delhi Capitlas Have Captaincy Replacement In Mind And Its NOT Smith Or Rahane)

भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांत श्रेयसला दुखापत झाली. शार्दूल ठाकूरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर एक वेगवान बॉल रोखण्याचा त्याने प्रयत्न श्रेयस करत होता. त्यावेळी त्याचा खांदा दुखावला गेला. दुखापत गंभीर असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रेयसची ही दुखापत गंभीर असून त्यातून सावरायला त्याला बराच वेळ लागेल, असं बोललं जात आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार श्रेयसच्या खांद्याची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे आगामी दोन वन डे सामन्यांना तो मुकणार आहेच, तसेच तो आगामी आयपीएलमध्ये सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. तर काही माध्यमांनी दावा केला आहे की, श्रेयस अय्यर आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक सामन्यांमध्ये उपलब्ध नसेल. दरम्यान, श्रेयस इंग्लंडविरोधातील उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांना श्रेयस मुकणार असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिले आहे. तसेच श्रेयस कदाचित आयपीएलमधील काही सामन्यांना मुकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

अजिंक्य रहाणे, रवी अश्विन?

श्रेयसच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा कोणाकडे सोपवली जाईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काहींचे म्हणणे आहे की, दिल्लीच्या संघाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणे किंवा रवीचंद्रन अश्विनकडे सोपवली जाऊ शकते. परंतु अजिंक्य रहाणे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. अशीच परिस्थिती अश्विनचीदेखील आहे. त्यामुळे या दोघांकडे दिल्लीचं कर्णधारपद दिलं जाणार नाही.

तरुण खेळाडूकडे नेतृत्व

दरम्यान, दिल्लीच्या संघाने नुकत्याच झालेल्या लिलावाद्वारे ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज स्टिव्ह स्मिथला स्वतःच्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. त्यामुळे चांगले नेतृत्वगुण असलेला खेळाडू दिल्लीच्या संघात आहे. परंतु दिल्लीचा संघ स्मिथकडे कर्णधारपद न सोपवता एका तरुण भारतीय खेळाडूच्या नावाचा विचार करत आहे. त्या खेळाडूचं नाव आहे ऋषभ पंत. भारतीय संघातील आक्रमक डावखुरा फलंदाज असलेला ऋषभ पंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याची बॅट तळपतेय. आयपीएलमध्येदेखील त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापन ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवू शकतं.

संबंधित बातम्या

Video | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला

148 KMPH वेगाच्या बॉलचा उजव्या हातावर फटका, रोहित शर्मा मैदानावर वेदनेने व्हिव्हळला

(Shreyas Iyer Injury : Delhi Capitlas Have Captaincy Replacement In Mind And Its NOT Smith Or Rahane)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.