AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरसारखाच षटकार ठोकणारा खेळाडू हैदराबाद संघात दाखल, प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा!

आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी (IPL 2021) सनरायजर्स हैदराबाद (Surisers Hydrabad) संघामध्ये डेव्हिड वॉर्नगरसारखाच सिक्सर खेचणारा इंग्लंडचा ओपनर फलंदाज जेसन रॉय (Jayson Roy) दाखल झाला आहे.

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरसारखाच षटकार ठोकणारा खेळाडू हैदराबाद संघात दाखल, प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा!
Jayson Roy
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 01, 2021 | 11:24 AM
Share

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी (IPL 2021) सनरायजर्स हैदराबाद (Surisers Hydrabad) संघामध्ये डेव्हिड वॉर्नगरसारखाच सिक्सर खेचणारा इंग्लंडचा ओपनर फलंदाज जेसन रॉय (Jayson Roy) दाखल झाला आहे. आक्रमक फटके खेळण्यात आणि षटकार ठोकण्यात तो डेव्हिड वॉर्नरसारखाच (David Warner) आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळताना मला आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया जेसन रॉय याने दिली आहे.  (IPL 2021 Jayson Roy Join Surisers Hydrabad)

जेसन रॉय हैदराबाद संघात

सनरायजर्स हैदराबादने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत जेसन रॉयची कामगिरी ठीक होती परंतु चांगल्या आणि आश्वासक सुरुवातीनंतर त्याला मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं. जेसन रॉयने 2017 साली गुजरात लॉयन्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तसंच 2018 मध्ये तो दिल्लीकडून खेळला.

जेसन रॉय फटकेबाजी करण्यात माहिर

इंग्लंडकडून ओपनिंगला येऊन सुरुवाचीच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करण्यात जेस रॉय माहिर आहे. पॉवरप्लेमध्ये तो आक्रमक फटके खेळण्यात तरबेज आहे. जागेवरुन षटकार ठोकण्यातही तो माहिर आहे. चौकार आणि षटकारांनी तो अधिक धावा करतो.

जेसन रॉयची आयपीएलमधील छोटीशी कारकीर्द

जेसन रॉयने आतापर्यंत 8 मॅचेसमध्ये 179 रन्स केले आहेत. 9 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल सामन्यांत हैदराबाद संघात मिशेल मार्शच्या जागी जेसन रॉयचा समावेश केला गेला आहे. मिशेल मार्श वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल खेळू शकणार नाही. त्याच्या जागी जेसन रॉय खेळणार आहे.

प्रतिक्षा पहिल्या सामन्याची…

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(IPL 2021 Jayson Roy Join Surisers Hydrabad)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलमध्ये हे 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात!

IPL 2021 : चेतेश्वर पुजाराचे उत्तुंग षटकार, नेटकरी म्हणतात, धोनीच्या संगतीचा परिणाम?

IPL 2021 : आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, आकाश चोप्राचं नेमकं उत्तर!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...