AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI v SRH IPL 2021, Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) महेंद्रसिंह धोनीला पछाडत आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक सिक्स लगावणारा (most sixes in the ipl) भारतीय फलंदाज ठरला आहे.

MI v SRH IPL 2021, Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक
'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) महेंद्रसिंह धोनीला पछाडत आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक सिक्स लगावणारा (most sixes in the ipl) भारतीय फलंदाज ठरला आहे.
| Updated on: Apr 17, 2021 | 8:49 PM
Share

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) नववा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने शानदार सुरुवात केली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 25 चेंडूत 32 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत प्रत्येकी 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. या 2 सिक्ससह रोहितने विक्रमाला गवसणी घातली आहे. (ipl 2021 mi vs srh rohit sharma became the first Indian batsman to hit the most sixes in the ipl)

काय आहे विक्रम?

रोहित शर्मा या 2 सिक्ससह आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पछाडत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 1 सिक्स लगावला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स कोणाच्या नावे?

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत 351 सिक्स फटकावले आहेत. तर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मिस्टर 360 अर्थात एबी डीव्हीलयर्सचा क्रमांक आहे. डीव्हीलियर्सने 237 सिक्स ठोकले आहेत. तर त्यानंतर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 216 षटकार मारले आहेत.

IPL मध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे फलंदाज

ख्रिस गेल (351)

एबी डीव्हीलियर्स (237)

रोहित शर्मा (217)

एम एस धोनी (216)

मुंबईकडून आणखी एका खेळाडूला पदार्पणाची संधी

कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने एका खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. न्यूझीलंडचा वेगवागन गोलंदाज एडम मिल्नला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं हे डेब्यू ठरला आहे. रोहितने एडमला मुंबईची कॅप देत त्याचं स्वागत केलं.

दोन्ही संघात बदल

या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. मुंबईत 1 बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मार्को यानसनच्या जागी एडम मिल्नला संधी दिली आहे. तर हैदराबादने एकूण 4 बदल केले आहेत. संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह, खलील अहमद आणि मुजीब उर रहमानला संधी देण्यात आली आहे. विराट सिंहचं यानिमित्ताने पदार्पण ठरलं आहे. तर मुजीबचा हैदराबादसाठीचा पहिलाच सामनाआहे.

मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 खेळाडू

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरान पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, ऐडम मिल्न, ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

सनरायजर्स हैदराबादचे शिलेदार

डेव्हीड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, विराट सिंह, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मुजीब-उर-रहमान

संबंधित बातम्या :

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Score, IPL 2021 : मुंबईला तिसरा धक्का, क्विटंन डी कॉक आऊट

(ipl 2021 mi vs srh rohit sharma became the first Indian batsman to hit the most sixes in the ipl)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.