IPL 2026 Schedule : आयपीएलच्या सामन्यांबाबत सर्वांत मोठी अपडेट, सगळेच सामने…BCCI हादरवणारा निर्णय घेण्याची शक्यता!

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर लगेच आयपीएल 2026 चालू होणार आहे. या स्पर्धेसाठी आता तयारी केली जात आहे. असे असतानाच एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

IPL 2026 Schedule : आयपीएलच्या सामन्यांबाबत सर्वांत मोठी अपडेट, सगळेच सामने...BCCI हादरवणारा निर्णय घेण्याची शक्यता!
IPL 2026 Schedule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 7:06 PM

सध्या जगभरात टी-20 विश्वचषकाची धूम आहे. या स्पर्धेत अटीतटीचे सामने होत आहेत. या स्पर्धेत भारताने बाजी मारून जेतेपदाची ट्रॉफी आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच बहुचर्चित अशा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या स्पर्धेत दरवर्षी कोट्यधीची उलाढाल होते. तसेच या स्पर्धेत अनेक नवख्या खेळाडूंना संधी मिळते. असे असतानाच आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण 25 सामने

मिळालेल्या माहितीनुसार यंदा बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक दोन भागांमध्ये जारी करण्याची दाट शक्यता आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा संपली की आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. परंतु आयपीएल जेव्हा सुरू होईल त्याच काळात भारतात पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आसाम या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे हीच बाब लक्षात घेऊन यावेळी आयपीएलचे वेळापत्रक दोन टप्प्यांत घोषित केले जाणार आहे. सामनेही दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण 20 ते 25 सामने होण्याची शक्यता आहे. या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत होऊ शकते. तर दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक हे मार्च महिन्याच्या मध्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीमुळे दोन टप्प्यांत वेळापत्रक

पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांत निवडणूक असल्याने पोलीस, सुरक्षा व्यवस्था या निवडणुकीत व्यग्र असेल. त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था काय राहावी म्हणून या निवडणुका लक्षात घेऊनच दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीमुळे जेव्हा पश्चिम बंगालमधील ईडन गार्डनवर सामना होऊ शकत नाही तेव्हा आसाममधील गुवाहाटीजवळ असलेल्या बारासपारा स्टेडियमवर मॅचेस खेळवले जातात. परंतु आता या दोन्ही राज्यांत निवडणुका असल्याने आता आयपीएलचे वेळापत्रक दोन टप्प्यात खेळवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेच आयपीएल 2026 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांची तयारी चालू झालेली आहे. त्यामुळे आता हा थरार कधी रंगणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.