AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: न्यूझीलंडमध्ये पोहोचताच वैभव सू्र्यवंशीला मिळाली वॉर्निंग, काय घडलं?

IND vs NZ T20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेला आता सुरुवात होईल. या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीला न्यूझीलंडकडून थेट वॉर्निंग मिळाली आहे.

Vaibhav Sooryavanshi: न्यूझीलंडमध्ये पोहोचताच वैभव सू्र्यवंशीला मिळाली वॉर्निंग, काय घडलं?
| Updated on: Oct 20, 2026 | 12:35 PM
Share

IND vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेला आता सुरुवात होणार आहे. या मालिकेला दोन दिवस शिल्लक आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आता मालिकेपूर्वीच वैभवला आता एक इशारा मिळाला आहे. न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाने वैभवला थेट वॉर्निंग दिली आहे.

पहिला टी-२० सामना २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे होणार असून, न्यूझीलंड संघाने सामन्यापूर्वी कसून सराव केला. सरावानंतर, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीने भारतीय संघाच्या फलंदाजी विभागाबद्दल एक जोरदार विधान केले. विशेषतः, तो १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीबद्दल म्हणाला की, “जर त्याने संयम राखला नाही, तर तो न्यूझीलंडमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही.”

माध्यमांशी बोलताना डफीने वैभव सूर्यवंशीची प्रशंसा केली, पण त्याचबरोबर असेही सांगितले की, “किवी गोलंदाजांकडे त्याच्यासाठी एक संपूर्ण योजना आहे. वैभव सूर्यवंशीमध्ये प्रचंड प्रतिभा आहे हे स्पष्ट आहे. त्याने आयपीएलमध्ये आपली छाप पाडली आणि विशेष म्हणजे तो खूप वेगाने फलंदाजी करतो. त्याचा स्ट्राईक रेट सुमारे २५० आहे आणि तो क्वचितच चुकतो. पण न्यूझीलंडमध्ये खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. येथील परिस्थिती त्याच्यासाठी वेगळी असेल आणि हे एक आव्हान असेल.”

जेकब डफी म्हणाला की, “भारताने अलीकडेच टी-२० मध्ये २५० धावा केल्या असल्या तरी, न्यूझीलंडमध्ये तसे होणार नाही.  न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर १७० ते १९० धावा करणेही कठीण होईल. न्यूझीलंडची परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे, त्यामुळे इथे खेळणे कठीण होते. किवी गोलंदाज भारतीय फलंदाजांविरुद्ध निश्चितपणे शॉर्ट-बॉल रणनीतीचा अवलंब करतील. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवरील अतिरिक्त उसळी किवी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते.”

मागच्या वेळी जेव्हा टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आली होती, तेव्हा त्यांनी टी-२० मालिका १-० ने जिंकली होती. शिवाय, २०१९-२० मध्ये भारताने न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सर्व पाच सामन्यांमध्ये पराभूत केले होते. याचा अर्थ, न्यूझीलंडला मायदेशात भारतीय संघाकडून शेवटच्या सहा टी-२० सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आता या मालिकेत काय होते हे पाहणे बाकी आहे.

Follow Us
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?