AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह फिट असून पण पाच सामन्यातून OUT, टीम इंडियाने उचललं मोठं पाऊल

Jasprit Bumrah : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह फिट आहे. पण तरीही तो पाच सामन्यात खेळणार नाहीय. जसप्रीत बुमराहच्या बाबतीत टीम मॅनेजमेंटने हा मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाची सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांची टी20 सीरीज सुरु आहे.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह फिट असून पण पाच सामन्यातून OUT, टीम इंडियाने उचललं मोठं पाऊल
Jasprit Bumrah Image Credit source: PTI
| Updated on: Oct 15, 2026 | 4:39 PM
Share

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध टी20 टीमची घोषणा झाली आहे. पण अजूनही वनडे आणि टेस्ट स्क्वाडची घोषणा बाकी आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात टीमची घोषणा होईल. हार्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत सारख्या खेळाडूंचं फिटनेस अपडेट आल्यानंतर टीमची घोषणा होईल. जसप्रीत बुमराहबद्दल बातमी अशी आहे की, न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये त्याला संधी मिळणार नाही. म्हणजे पाच सामन्यांची वनडे सीरीज खेळणार नाही. बुमराहने कसोटी सामन्यांकडे लक्ष द्यावं अशी टीम मॅनेजमेंटची इच्छा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार बुमराह पूर्णपणे फिट आहे. पण टीम मॅनेजमेंटची इच्छा आहे की, वेलिंगटनमध्ये 19 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी इंडिया ए कडून सराव सामना खेळावा. बुमराहने आता कसोटी सामन्यांची तयारी सुरु केली आहे. तो लवकरच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये जाईल.

बीसीसीआयच्या सूत्रानुसार “मोठ्या टूरसाठी बुमराह उपलब्ध असला पाहिजे. कसोटी मालिका महत्वाची आहे म्हणून टीम मॅनेजमेंटला त्याला वनडे सीरीजमध्ये संधी द्यायची नाहीय. बुमराह टेस्ट सीरीजसाठी फिट पाहिजे” बुमराह मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर गुडघे दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर गेला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंड विरुद्ध जिंकणं आवश्यक आहे. म्हणून बुमराहला कसोटी मालिकेत उतरवण्याची टीम इंडियाची प्लानिंग आहे.

बुमराहसाठी अशी रणनिती का?

बुमराहबद्दल हा प्लान फक्त न्यूझीलंड दौऱ्यासाठी केलेला नाही. पुढच्यावर्षी सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या महत्वाच्या सामन्यातही बुमराहला खेळवलं जाईल. पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी बुमराह पूर्णपणे फिट असावा अशी टीम इंडियाची इच्छा आहे. टीम इंडियाची ही रणनिती यशस्वी होते का? ते पहावं लागेल. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा हुकूमी एक्का आहे. आता वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेत त्याची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे.  बुमराहमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्याची गोलंदाजी अनेकदा जय-पराजयातील अंतर ठरवते.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?