AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kavya Maran And Aniruddh Ravichander: काव्या मारन आणि अनिरुद्ध ग्रीसमध्ये नाहीतर भारतातील सुंदर ठिकाणी घेणार सात फेरे, जवळच्या मित्राकडून माहिती

Kavya Maran And Aniruddh Ravichander Wedding: काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे, आता यांचे लग्न कुठे होणार आहे ते ठिकाणं समोर आले आहे.

Kavya Maran And Aniruddh Ravichander: काव्या मारन आणि अनिरुद्ध ग्रीसमध्ये नाहीतर भारतातील सुंदर ठिकाणी घेणार सात फेरे, जवळच्या मित्राकडून माहिती
| Updated on: Oct 22, 2026 | 9:43 AM
Share

Kavya Maran And Aniruddh Ravichander Wedding Venue: प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंद्रन आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. यांच्या लग्नाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. आता हे दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. ते परदेशात नाही तर भारतातील एका सुंदर ठिकाणी लग्न करणार आहे.

अनिरुद्ध आणि काव्या मारन हे लग्न ग्रीसमध्ये करणार नाहीत. लग्नाच्या ठिकाणाबाबत नवीन दावे समोर आले आहेत. अनेक वृत्तांनुसार, हे जोडपे पुढच्या महिन्यात ग्रीसमध्ये विवाहबद्ध होऊ शकते, परंतु अनिरुद्धचा जवळचा मित्र, अभिनेता-गायक ब्योर्न सुराव याने या अटकळी फेटाळून लावल्या आहेत. TOI च्या वृत्तानुसार, ब्योर्न सुरावने सांगितले आहे की, “लग्न चेन्नईमध्ये होणार आहे. ”

नुकताच रजनीकांतच्या ‘जेलर २’ या चित्रपटात दिसलेल्या ब्योर्नने फिल्मबीटला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. अनिरुद्ध, काव्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप लग्नाच्या ठिकाणाची जाहीरपणे पुष्टी केलेली नाही. ब्योर्न म्हणाला, “अनिरुद्ध ग्रीसमध्ये लग्न करणार असं काही नाही. त्यांचे लग्न चेन्नईमध्ये होणार आहे.”

ब्योर्न अनिरुद्धला कॉलेजपासून ओळखतो आणि त्याने ‘डॉक्टर’, ‘जेलर’ आणि ‘जेलर २’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्याच्या अलीकडील वक्तव्यामुळे अनिरुद्ध रविचंद्रन आणि काव्या मारन यांच्या लग्नाचे ठिकाण चेन्नई असल्याचे समजले आहे. अनिरुद्ध आणि काव्या ११ नोव्हेंबरला विवाहबद्ध होण्याची शक्यता असून, २१ नोव्हेंबरला रिसेप्शन असणार आहे अशी चर्चा रंगली आहे. हा विवाहसोहळा एक खाजगी समारंभ असेल, ज्यात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. रिसेप्शनमध्ये चित्रपटसृष्टी, बिजनेसमॅन आणि राजकारणातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वृत्तांनुसार, सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांनी अनेक प्रमुख राजकीय नेत्यांना स्वागत समारंभासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांचाही निमंत्रितांमध्ये समावेश आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?