Kavya Maran Wedding : IPL टीमची मालक काव्या मारन होणार रजनीकांत यांची सून; जाणून घ्या तिचं शिक्षण आणि नेटवर्थ
काव्या मारन, आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादची सीईओ, तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनशी तिचा विवाह ठरल्याची चर्चा असून, यामुळे तिचं शिक्षण, नेटवर्थ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे. ती सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची कन्या असून, सनरायझर्स हैदराबादचे कामकाज पाहते.

IPL टीम सनरायजर्स हैजराबादची सीईओ आणि सन टीव्हीची काव्या मारन सध्या बरीच चर्चेत आहे. कंपोजर अनिरुद्ध रविचंद्रनशी लग्न ठरल्यामुळे तिच्या नावाची खूप चर्चा आहे. काव्याचे पालक आणि सन ग्रुप चेअरमन श्री कलानिधि मारन आणि कावेरी मारन या दोघांनी काव्याच्या लग्नाच्या रिसेप्शनचं निमंत्रण मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिलं. 21 नोव्हेंबरला हे रिसेप्शन पार पडणार आहे. काव्या मारनच्या होणाऱ्या नवऱ्याचं रजनीकांत यांच्यासोबत नातं आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या , अनिरुद्ध रविचंद्रनची मावशी आहेत. काव्या मारनचा विवाह सध्या बराच चर्चेत असून याच पार्श्वभूमीवर तिचं शिक्षण, नेटवर्थ आणि फॅमिलि बॅकग्राऊंड जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे. किती झालंय काव्याचं शिक्षण ? चला जाणून घेऊया.
कोण आहे काव्या मारन ?
सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची कन्या म्हणजे काव्या मारन. कलानिधी मारन यांची एकूण संपत्ती 2.6 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 24,629.34 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं. नेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, काव्या मारन हिने चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, तर एमबीए करण्यासाठी ती युनायटेड किंगडममधील वॉरविक बिझनेस स्कूलमध्ये (Warwick Business School) गेली. अभ्यासासोबतच काव्याने करिअर, मीडिया आणि स्पोर्ट्स बिझनेस क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सन ग्रुपच्या आयपीएल फ्रँचायझी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व आणि व्यवस्थापनाशी संबंधित भूमिकेमुळे काव्या मारन ही नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा ती सामन्यादरम्यान आपल्या संघाला प्रोत्साहन देताना दिसते. आता आयपीएल संघाच्या मालक असलेल्या काव्या मारन हिच्या लग्नाच्या बातम्या इंटरनेटवर वेगाने पसरत असून, चाहते तिच्या अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुकत दिसतात.
काव्या मारनचे नेटवर्थ
सांगायचं झालं तर काव्या मारन हिची वैयक्तिक संपत्ती किंवा नेटवर्थबद्दल स्वतंत्र, अधिकृत माहिती उपलब्ध नाहीये. मात्र असं असलं तरी फोर्ब्सच्या माहितीनुसार तिचे वडील कलानिधी मारन यांची अंदाजित संपत्ती 2.6 अब्ज डॉलर असल्याचं सांगितलं जातं. कौटुंबिक प्रकाशन व्यवसायातून सुरुवात केल्यानंतर कलानिधी मारन यांनी त्यांचा मीडिया बिझनेस सुरू केला. 1992 साली त्यांनी सन टीव्ही नेटवर्क सुरू केलं आणि पाहता पाहता त्याचा प्रादेशिक टेलिव्हिजन नेटवर्कमध्ये विस्तार झाला. या नेटवर्कअंतर्गत आज एकूण 37 चॅनेल्स असून, ते भारतातील सुमारे 14 कोटी लोकांपर्यंत पोहोचतात. काव्या मारन ही सन ग्रुपच्या स्पोर्ट्स ऑपरेशनचं कामकाज पाहते आणि त्यातच सनरायजर्स हैदरबादचाही समावेश आहे.
काव्या-अनिरुद्धचं लग्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदन दोघेही लौकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये त्यांचा विवाह पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी चेन्नईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
या विवाहाच्या रिसेप्शनसंदर्भातील बातमीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या एक्सवरील पोस्टमुळे महत्त्व प्राप्त झालं आहे. या पोस्टनुसार, कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी मुख्यमंत्र्यांच्या जुबली हिल्स येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्या पोस्टमध्ये सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या विवाहाच्या रिसेप्शनसाठी निमंत्रित केल्याचे नमूद केलं होतं.
अनिरुद्ध रविचंद्रन हा साऊथमधील नामांकित म्युझिक कंपोझर , गायक आणि प्रोड्युसरआहे, 2012 साली आलेलं त्याचं व्हाय धिस कोलावरी डी हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय ठरलं आणि त्याचं नाव सर्वदूर पसरल. ‘जेलर’, ‘लिओ’, ‘जवान’, ‘विक्रम’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या संगीतालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
