AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : दिनेश कार्तिक तुफान फॉर्मात, सरावादरम्यान चौकार-षटकारांची बरसात, Video पाहाच…

आयपीएलमधील दमदार टीम असलेली केकेआरने (kolkata Knight Riders) त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक शानदार व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिनेश कार्तिक जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे.

IPL 2021 : दिनेश कार्तिक तुफान फॉर्मात, सरावादरम्यान चौकार-षटकारांची बरसात, Video पाहाच...
दिनेश कार्तिकची शानदार इनिंग
| Updated on: Apr 08, 2021 | 5:29 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) उद्यापासून प्रारंभ होणार आहे. आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात होणार आहे. आयपीएलसाठी सर्वच टीम प्रचंड मेहनत घेऊन सराव करताना दिसत आहे. आयपीएलमधील दमदार टीम असलेली केकेआरने (kolkata Knight Riders) त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक शानदार व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिनेश कार्तिक जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. (KKR Dinesh karthik Fantastic inning Practice Match IPL 2021)

दिनेश कार्तिकची फटकेबाजी, मैदानाच्या चारही कोपऱ्यात सुंदर फटके

दिनेश कार्तिकने सरावादरम्यान 50 चेंडूंवर 90 रन्स करून त्याच्या बॅटिंगचा जलवा दाखवला आहे. त्याच्या खेळीदरम्यान त्याने मैदानाच्या चारही कोपऱ्यात शॉट्ची मुक्तहस्तपणे उधळण केली. कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पुल, अशा फटक्यांनी त्याने ऑन साईड आणि लेग साईडला भरपूर धावा वसूल केल्या.

यामुळे दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये चांगली फलंदाजी करून संघाला विजेतेपद मिळवून देईल, अशी केकेआरच्या चाहत्यांना आशा आहे. गेल्या मोसमात दिनेश कार्तिकने आयपीएलच्या कर्णधार सोडलं, त्यानंतर इयन मॉर्गन संघाचा कर्णधार झाला.

गौतम गंभीरनंतर कोलकात्याची कामगिरी ढासळली

यावर्षी हरभजन सिंगही केकेआर संघाकडून खेळणार आहे. गौतम गंभीरच्या संघातून जाण्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी ढासळत गेली. परंतु इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन वेळचा चॅम्पियन संघ राहिलेल्या कोलकाता संघ यंदा मात्र काहीही करुन विजेतेपद मिळवायचं, या इराद्यानेच मैदानात उतरेन.

पाठीमागील हंगामात निराशा

यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या आयपीएल हंगामात केकेआरच्या संघाने सलामीच्या जोडीपासून मधल्या फळीपर्यंतच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. अगदी चालू स्पर्धेदरम्यानकर्णधार देखील बदलला गेला पण संघाच्या कामगिरीत काही फरक पडला नाही.

आयपीएलचा पहिला सामना मुंबई विरुद्ध बंगळुरु

9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल (IPL 2021) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आयपीएलचा पहिला सामना मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळविला जाणार आहे.

(KKR Dinesh karthik Fantastic inning Practice Match IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबईच्या तळपत्या ‘सूर्या’चा विराटसेनेला धोका, सलामीच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध मोठी खेळी?

MI vs RCB : मुंबई इंडियन्स IPL 2021 मधला सलामीचा सामना गमावणार?

आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPLसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडली, शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणतो…

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.