… म्हणून धोनी आणि साक्षीला जमिनीवरच झोपावं लागलं

मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी मैदानात आणि मैदानाबाहेरही सतत चर्चेत असतो. अत्यंत साधेपणा ही धोनीची आणखी एक ओळख आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. धोनीने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्याची पत्नी साक्षी आणि तो एअरपोर्टवर जमिनीवर झोपले आहेत. विमानाची वाट पाहत बॅग डोक्याखाली […]

... म्हणून धोनी आणि साक्षीला जमिनीवरच झोपावं लागलं
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी मैदानात आणि मैदानाबाहेरही सतत चर्चेत असतो. अत्यंत साधेपणा ही धोनीची आणखी एक ओळख आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. धोनीने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्याची पत्नी साक्षी आणि तो एअरपोर्टवर जमिनीवर झोपले आहेत. विमानाची वाट पाहत बॅग डोक्याखाली घेऊन ते दोघे जमिनीवरच झोपले.

आयपीएल सामन्यांमुळे धोनीचं शेड्यूल सध्या अत्यंत व्यस्त आहे. धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जकडे एवढी व्यस्तता आहे, की विजय सेलिब्रिट करायलाही वेळ नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळाल्यानंतर सीएसके टीम तातडीने जयपूरसाठी रवाना झाली. त्यामुळे कोणताही विलंब न करता सर्व खेळाडू विमानतळावर आले.

धोनीने फोटोसह कॅप्शन देत त्याच्या फोटोबद्दल खुलासाही केला. आयपीएलच्या व्यस्त वेळेत जर तुमची सकाळची फ्लाईट असेल तर ही अवस्था होते, असं तो म्हणाला.