किम शर्माचा लिएंडर पेस सोबत रोमान्स, Kiss करतानाचा फोटो झाला व्हायरल

अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतही किमच्या रिलेशनशिपची चर्चा झाली होती. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर किम एकटी होती. किम आता लिएंडरच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.

किम शर्माचा लिएंडर पेस सोबत रोमान्स, Kiss करतानाचा फोटो झाला व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:09 PM

मुंबई: अभिनेत्री किम शर्मा (Kim sharma) चित्रपटांपासून दूर असली, तरी ती चर्चेमध्ये मात्र नेहमी असते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबत लंच करतानाचा फोटो शेअर केला होता. किम भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेससोबत (Leander paes) रिलेशनशिपमध्ये आहे. तिने लिएंडरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामध्ये लिएंडर किमच्या गालावर किस करताना दिसतो. दोघेही एकत्र ख्रिस्मसच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

फोटो झाला व्हायरल किम शर्मा लिएंडर पेसला डेट करत असल्याच्या बातम्या होत्या. दोघांना मुंबईत एकत्र पाहण्यातही आले होते. त्याशिवाय गोव्यालाही दोघे सोबत गेले होते. रिलेशनशिपच्या चर्चांवर दोघेही अजून मौन बाळगून आहेत. अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतही किमच्या रिलेशनशिपची चर्चा झाली होती. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर किम एकटी होती. किम आता लिएंडरच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.

लिएंडरचे रिया पिल्लई सोबत लग्न झाले होते. पण काही काळानंतर दोघे विभक्त झाले. मोहब्बते चित्रपटातून किम शर्माला ओळख मिळाली. तुमसे अच्छा कौन हैं, टॉम डिक अँड हॅरी, जिंदगी रॉक्स, मनी है तो हनी है, या चित्रपटांमध्ये किमने काम केले आहे. चित्रपटसृष्टीतून किमला फक्त ओळख मिळाली. यश तितके मिळू शकले नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.