कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रौप्य पदक मिळवलेल्या बॉक्सर लवलीनाचा संताप, भारताचा नकाशा पाहून सुनावलं Video

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची सांगता 2 ऑगस्टला होणार आहे. असं असताना या स्पर्धेदरम्यान एका वादाने लक्ष वेधून घेतलं. रौप्य पदक पटकावलेल्या बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने भारताचा नकाशा पाहून संताप व्यक्त केला आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रौप्य पदक मिळवलेल्या बॉक्सर लवलीनाचा संताप, भारताचा नकाशा पाहून सुनावलं Video
कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रौप्य पदक मिळवलेल्या बॉक्सर लवलीनाचा संताप, भारताचा नकाशा पाहून सुनावलं Video
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 02, 2026 | 9:31 PM

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. 13 सुवर्णपदकं जिंकली असून पदकतालिकेत टॉप 5 मध्ये जागा मिळवली आहे. या स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये सात गोल्ड मेडल मिळवले. पण लवलीना बोरगोहेन सुवर्ण पदकाला मुकली. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिायच्या स्पर्धकाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. लवलीना बोरगोहेन महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-सू ग्रीनट्रीकडून 1-4 अशा स्प्लिट डिसीजन गुणांच्या फरकाने पराभूत झाली. पहिल्या राऊंडमध्ये दुखापतीचा फटका बसला, त्यानंतर दुसऱ्या डावात जोरदार कमबॅक केलं. पण शेवटच्या डावात पराभव झाला त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या सामन्यानंतर लवलीना बोरगोहेनसह इतर सदस्य ग्लासगोतील भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेले होते. मिस्टर सिंह इंडिया नावाचं हे रेस्टॉरंट होतं आणि तिथे नॅपकिन ठेवले होते. त्यावर छापलेला भारताच्या नकाशावर तिची नजर पडली आणि तिचा संताप झाला.

काय आहे प्रकरण?

लवलीना बोरगोहेन भारताचा नकाशा पाहिला त्यावर भारताचा पूर्वोत्तर भाग दाखवला नव्हता. त्यामुळे लवलीना बोरगोहेन हिचा संताप झाला. तिने तात्काळ रेस्टॉरेंटमध्ये आपला निषेध नोंदवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने हातात माईक घेऊन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “कृपया वाईट वाटून घेऊ नका. आपला पूर्वोत्तर भाग भारताच्या नकाशावर नाही, याचे मला थोडे वाईट वाटते. बाहेरही तसेच आहे, आपला पूर्वोत्तर भारत काढला आहे. कृपया भविष्यात याबाबत काळजी घ्या.” लवलीना बोरगोहेन हीच्या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

लवलीना बोरगोहेनची कामगिरी

ऑलिम्पिकच्या इतिहासात पदक जिंकणारी ती भारताची तिसरी बॉक्सर आणि आसामची पहिली महिला ठरली. तिने 69 किलो वजनी गटात हे पदक मिळवले होते.आता तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स या तिन्ही प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी भारताची तिसरी बॉक्सर बनली आहे. इतकंच काय तर 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 75 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकून स्वतःला ‘विश्वविजेती’ म्हणून सिद्ध केले आहे.हांगझू आशियाई खेळांमध्ये तिने 75 किलो गटात रौप्य पदक जिंकले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us