बास्केटबॉल खेळताना आयुष्याचा शेवट, जाणून घ्या काय घडलं?

| Updated on: Sep 20, 2022 | 6:13 PM

सोबत असलेल्या मित्रांनाही धक्का बसला, भारतातील घटना

बास्केटबॉल खेळताना आयुष्याचा शेवट, जाणून घ्या काय घडलं?
basketball
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: कोणाच आयुष्य किती आहे आणि ते कुठे संपेल, हे कोणीच सांगू शकत नाही. दुर्घटना, अपघातामध्ये काही जण आपले प्राण गमावतात. नशिबात काय लिहिलय हे कोणालाच ठाऊक नसतं. खेळाच्या मैदानातही काही जणांच्या आयुष्याचा शेवट होतो. अशीच एक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली. खेळाच्या मैदानात मृत्यू होण्याच्या घटना अपवादाने घडतात.

कुठे घडली घटना?

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळामध्ये एका 26 वर्षाच्या युवकाचा बास्केटबॉल खेळताना अचानक मृत्यू झाला. युवकाने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तो जमिनीवर बसला. जमिनीवर बेशुद्ध झाल्यानंतर मित्र त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.

कशामुळे मृत्यू?

पोलीस सध्या या युवकाच्या पोस्टमार्टम रिपोटची वाट पाहतायत. हार्ट अटॅकमुळे या युवकाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. भोपाळच्या हबीबगंजमधील एका खासगी शाळेत 26 वर्षांचा अभिषेक बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता.

त्रास सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर….

खेळत असताना अभिषेकने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली. मैदानाच्या शेजारी तो मित्रांच्या जवळ जाऊन बसला. छातीत दुखण्याचा त्रास सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर मित्र अभिषेकला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.

एम्स रुग्णालयात नेलं

तिथून अभिषेकला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. तो पर्यंत अभिषेकचा मृत्यू झाला होता. अभिषेकला भोपाळच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. पोस्टमार्टम नंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आलां.

पोस्टमार्टम रिपोटची प्रतिक्षा

सध्या पोस्टमार्टम रिपोटची प्रतिक्षा आहे, त्यातून त्याच्या मृत्यूच खरं कारण समोर येईल. अभिषेक अविवाहीत आहे. तो एमपी नगरच्या एका खासही फायनान्स कंपनीत नोकरी करायचा. अभिषेकचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. आई एका खासगी शाळेत नोकरी करते. अभिषेक सुरुवातीपासून स्पोर्ट्स आवडीने खेळायचा, असं नातेवाईकांनी सांगितलं. त्याला कुठलाही आजार नव्हता. नियमित व्यायाम करायचा.