AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं दुसरं पर्व; विजेत्यांना मिळणार 5 लाखांचं बक्षीस

टीव्ही 9 कॉर्पोरेट बॅडमिंट चॅम्पियन्स स्पर्धेच्या दुसर्‍या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा 15 मे ते 17 मे दरम्यान असणार आहे. तसेच हैदराबादमधील गोपीचंद अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत कर्मचाऱ्यांना कौशल्य दाखवण्याची संधी आहे.

TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं दुसरं पर्व; विजेत्यांना मिळणार 5 लाखांचं बक्षीस
TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं दुसरं पर्व; विजेत्यांना मिळणार 5 लाखांचं बक्षीसImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 17, 2026 | 3:25 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कने मागच्या वर्षापासून कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन सुरू केलं आहे. या स्पर्धेला मागच्या पर्वात चांगला पाठिंबा मिळाला होता. आता या स्पर्धेचं दुसरं पर्व असून त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. व्यावसायिकेतसोबत स्पर्धात्मक भावना रूजवण्यास या स्पर्धेमुळे मदत होत आहे. या स्पर्धेमुळे उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधीही मिळते. मागच्या पर्वात दिग्गज कंपन्यांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला होता. मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, ॲमेझॉन, आयकिया, मेक माय ट्रिप, टाइम्स ऑफ इंडिया, एबीबी, डॉ. रेड्डीज, नोव्हार्टिस, डेल, कॅबजामिनी, ग्रीनको यांसारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेत 1 हजाराहून अधिक सामने खेळले गेले होते. यंदा स्पर्धेचं दुसरं पर्व असून यावेळी स्पर्धेत आणखी रंगत येणार आहे. कारण हे पर्व मागच्या पर्वापेक्षा मोठं असेल.

कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा 15 मे ते 17 मे 2026 दरम्यान असणार आहे. हैदराबादधील प्रतिष्ठित पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. दिग्गज बॅडमिंटनपटू आणि द्मभूषण पुरस्कार विजेते पुलेला गोपीचंद यांच्या सहयोगाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. गोपीचंद यांनी जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यात आणि भारतात या खेळाला मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चॅम्पियनशिपसोबतच्या त्यांच्या सहयोगामुळे या जागतिक दर्जाच्या स्पर्धेच्या व्यावसायिकतेला, विश्वासार्हतेला आणि आयोजनाला हातभार लागला आहे.

स्पर्धेचं स्वरूप आणि नियम

  • चॅम्पियनशिप डिव्हिजनमध्ये पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील. एका संघात किमान 3 आणि कमाल 5 सदस्यांना परवानगी आहे. संघातील सर्व सदस्य एकाच कंपनीचे असणे आवश्यक आहे.
  • ओपन डिव्हिजन चॅम्पियनशिप: या डिव्हिजनमध्ये वैयक्तिक सहभाग शक्य आहे.
  • एकल : सहभागी एकाच किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमधील असू शकतात.
  • मिश्र दुहेरी: सहभागी एकाच किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे असू शकतात.

बक्षीसाची रक्कम

या चॅम्पियनशिपमध्ये सर्व गटांसाठी मिळून एकूण 5 लाख रुपयांचं बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चषक आणि विशेष सन्मानांनी गौरविण्यात येईल.

कसा भाग घ्याल

अधिक माहितीसाठी आणि नोंदणी करण्यासाठी www.tv9x.com/corporatecup या संकेतस्थळाला भेट द्या. कोणत्याही शंका किंवा प्रश्नांसाठी corporatecup@tv9.com किंवा 70320 03222 या नंबरवर संपर्क साधा.

कार्यक्रमातील भागीदारी आणि सहयोगासाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधा:

  • आंध्र प्रदेश आणि तेलंगणा: एमएन चार्य: 9948299698
  • कर्नाटक: श्रीधर – 9008026103
  • कोलकाता: मोहुआ रॉय – 8334872780
  • दिल्ली: विकास – 9810266385
  • गुजरात: मौलिक शाह – 9909941607
  • महाराष्ट्र: भूषण – 9820139372

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...