WWE सुपरस्टारने पोस्ट केला सिद्धार्थ शुक्लाचा फोटो, भारतीय फॅन्ससह सर्वच भावूक

वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच मुंबई येथे निधन झालं. या बातमीने त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

WWE सुपरस्टारने पोस्ट केला सिद्धार्थ शुक्लाचा फोटो, भारतीय फॅन्ससह सर्वच भावूक
John Cena posted sidharth shuklas photo

न्यूयॉर्क:  वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेंट अर्थात WWE या जगातील एका प्रसिद्ध खेळातील सुपरस्टार जॉन सीना (John Cena) कायमच त्याच्या भारतासंबधी पोस्टसाठी चर्चेत असतो. आता देखील त्याने नुकत्याच निधन पावलेल्या भारतीय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्याच्या या कृतीने पुन्हा एकदा भारतीय फॅन्सचं लक्ष त्याच्यकडे खेचलं गेलं असून अनेकजण ही पोस्ट पाहून भावुक झाले आहेत.

भारतीय टीव्ही जगतातीव एक प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’च्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या 41 वर्षांच्या सिद्धार्थचा मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याच्या श्रद्धांजलीच्या पोस्टनी सर्वचजण भावूक झाले होते. त्यात जॉननेही पोस्ट करत आपल्चा भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने या पोस्टला काहीच कॅप्शन दिलेले नाही. याआधी देखील जॉनने अनेक भारतवासियांबद्दल आणि भारताबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena)

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7’च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं ‘सावधान इंडिया’  आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

हे ही वाचा :

Siddharth Shukla Passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली आणि सकाळी तो उठूच शकला नाही!

Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?

(WWE Superstar john Cena posted Late actor Sidharth Shuklas photo on his instagram)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI