Sidharth Shukla Passes away: सिद्धार्थ अभिनयासह खेळांचाही होता दिवाना, जगातील प्रसिद्ध फुटबॉल क्लबविरुद्ध खेळला होता सामना

वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच मुंबई येथे निधन झालं. या बातमीने त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Sidharth Shukla Passes away: सिद्धार्थ अभिनयासह खेळांचाही होता दिवाना, जगातील प्रसिद्ध फुटबॉल क्लबविरुद्ध खेळला होता सामना
सिद्धार्थ शुक्ला

मुंबई : टीवी जगताती एक प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’च्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla)  हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अवघ्या 41 वर्षांच्या सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी रुग्णालयाने केली आहे. दरम्यान इतक्या तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या जाण्याने संपूर्ण कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अशावेळी सिद्धार्थच्या जवळचे लोक त्याच्या आठवणींना उजाळा देत त्याला आठवत आहेत. याच दरम्यान सिद्धार्थ अभिनयासह खेळांमध्येही उत्तम होता हे समोर आले आहे. सिद्धार्थ उत्कृष्ट फुटबॉल खेळत असून प्रसिद्ध फुटबॉल क्लब एसी मिलान (AC Milan) विरुद्ध तो फुटबॉल मॅच खेळला होता.

सिद्धार्थ बालपणी खेळांमध्ये खूप अॅक्टिव्ह होता. त्याने टेनिस आणि फुटबॉमध्ये शालेय संघाचे प्रतिनिधित्त्व देखील केले आहे. द ब्रिजच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थने शालेय जीवनात अनेक इव्हेंटमध्ये भाग घेत यश मिळवलं होतं. याच दरम्यान तो  एसी मिलान विरुद्ध सामना खेळला होता. इटलीचा संघ अंडर-19 टीमच्या एका कार्यक्रमासाठी मुंबई आला असताना सिद्धार्थ हा सामना खेळला होता.

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7’च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं ‘सावधान इंडिया’  आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा :

Siddharth Shukla Passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली आणि सकाळी तो उठूच शकला नाही!

Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?

(Late Bollywood actor siddharth shukla played football match against italy football club AC milan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI