AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘उडता अशरफ’, सुप्पर से भी उप्पर कॅच; तुम्हीही बघत राहाल!

पाकिस्तानच्या फहीम अशरफने हवेत सूर मारत दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा कॅच घेतला आणि त्याला तंबूत जायला भाग पाडलं. त्याच्या या सुप्पर से भी उप्पर कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Video : 'उडता अशरफ', सुप्पर से भी उप्पर कॅच; तुम्हीही बघत राहाल!
Faheem Ashraf Super Catch
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 03, 2021 | 9:22 AM
Share

मुंबई :  पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Pakistan vs South Africa) पार पडलेला पहिला एकदिवसीय सामना विशेष चर्चेत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली लढत… बाबर आझमचा (Babar Azam) खास वेगवान रेकॉर्ड तसंच फहीम अशरफचा (Faheem Ashraf) उडता कॅच…! क्रिकेटच्या मैदानावर आपण सुंदर कॅच पाहत असतो. पण पाकिस्तानच्या फहीम अशरफने हवेत सूर मारत दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा (Aiden Markram) कॅच घेतला आणि त्याला तंबूत जायला भाग पाडलं. त्याच्या या ‘सुप्पर से भी उप्पर कॅच’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  (Pakistan Faheem Ashraf Super Catch Against South Africa 1st one Day match)

बॅट्समन केवळ पाहत राहिला…!

फहीम अशरफने टिपलेला कॅच एवढा सुंदर होता की आऊट झालेला एडेन मार्कराम केवळ त्याच्याकडे पाहत राहिला. 7 व्या ओव्हरसाठी शाहीन आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला. त्याच्या चेंडूवर फटका लगावण्याच्या नादात त्याने चुकीचा शॉट खेळला. मीड ऑन वर उभा असलेल्या फहीम अशरफ हवेत सूर मारला आणि झेल टिपला. मार्करामने 23 चेंडूत 19 धावा केल्या. ही खेळी करताना मार्करामला चांगली लय सापडली होती. जर मार्करामचा कॅच फहीमने घेतला नसता तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता.

पाहा व्हिडीओ :

बाबर आझमची वेगवान 13 शतकं

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 103 धावांची शानदार खेळी केली.बाबरने या शतकासह वेगवान 13 शतके करण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाच्या नावावर होता. त्याने 83 डावात हा पराक्रम केला होता. हा पराक्रम पूर्ण करण्यासाठी बाबरने अवघ्या 76 डावांचा सामना केला. दुसरीकडे विराट कोहलीने 86 डावांमध्ये 13 शतके ठोकली आहेत.

बाबर आझमचा वेगवान रेकॉर्ड, पाकिस्तानने मॅचही जिंकली

या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी वेन डेर ड्यूसेनने 123 धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिड मिलरनेही 50 धावा केल्या. ज्याच्या बळावरदक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावून 273 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे शतक आणि इमाम उल हकच्या 70 धावांनी पाकिस्तानने शेवटच्या बॉलवर हा सामना 3 गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी, एनिच नॉर्ट्जेने शानदार चार गडी बाद केले, पण त्याचा फायदा त्याच्या संघाला होऊ शकला नाही.

या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर पाकिस्तानच्या संघाला 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

(Pakistan Faheem Ashraf Super Catch Against South Africa 1st one Day match)

हे ही वाचा :

IPL 2021 : यंदाचा आयपीएल करंडक कोण जिंकणार, तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स कुणाचा? दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

IPL 2021 : आधी पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा, आता बॅट्समनला आपल्या फिरकीवर नाचवतो, रवीचा संघर्षमय प्रवास

पाकिस्तानच्या बाबर आझमचा ‘वेगवान’ रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...