IPL 2021 : यंदाचा आयपीएल करंडक कोण जिंकणार, तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स कुणाचा? दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) यंदाच्या आयपीएलचा करंडक कोण जिंकणार तसंच गुणतालिकेत सर्वांत तळाशी कोण असणार, याविषयीची मोठी भविष्यवाणी केली आहे.

IPL 2021 : यंदाचा आयपीएल करंडक कोण जिंकणार, तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स कुणाचा? दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी
Scott Styris prediction IPL 2021
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 8:56 AM

मुंबईआयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या मोसमाचा रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काही दिवस राहिलेच. सगळ्या संघांची जोरदार तयारी सुरु आहे. कुणाचे ट्रेनिंग कॅम्प तर कुणाची प्रतिस्पर्धी संघांना मात देण्याची रणनिती… अशातच न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) यंदाच्या आयपीएलचा करंडक कोण जिंकणार तसंच गुणतालिकेत सर्वांत तळाशी कोण असणार, याविषयीची मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीने सगळ्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. (New Zealand Player Scott Styris Prediction IPL 2021 MI CSK RCB DC)

मुंबईकडे पुन्हा एकदा जेतेपद

स्कॉट स्टायरिसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या वर्षीही विजेतेपद बहाल केलं आहे. मुंबईचा संघ पाहता त्यांना हरवणं इतर संघांना कठीण जाईल, असं अनुमान लावत मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2021 चा करंडक जिंकेन, अशी मोठी भविष्यवाणी स्कॉटने केली आहे.

गुणतालिकेत चेन्नई तळाशी राहणार

पाठीमागच्या वर्षी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा परफॉर्मन्स खराब झाला. अगदी बाद फेरीत पोहोचायच्या अगोदर चेन्नईची टीम गारद झाली. यंदाच्या वर्षीही चेन्नईची हीच परिस्थिती कायम राहिल. चेन्नईची टीम गुणतालिकेत सगळ्यात तळाशी राहिल, असा अंदाज स्कॉट स्टायरिसने लावला आहे.

दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवर कोण?

आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या नंबरला रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स, तिसऱ्या क्रमाकांवर के.एल.राहुलची पंजाब टीम तर चौथ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबाद राहील. पाचव्या क्रमांकावर विराटची रॉयल्स चॅलेंज हैदराबाद असेल, तर सहाव्या क्रमाकांवर राजस्थान रॉयल्स राहिल,असा अंदाज स्क़ॉटने व्यक्त केला आहे.

स्कॉट स्टायरिसने केलेलं ट्विट-

प्रतिक्षा पहिल्या सामन्याची…

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(New Zealand Player Scott Styris Prediction IPL 2021 MI CSK RCB DC)

हे ही वाचा :

IPL 2021 : आधी पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा, आता बॅट्समनला आपल्या फिरकीवर नाचवतो, रवीचा संघर्षमय प्रवास

पाकिस्तानच्या बाबर आझमचा ‘वेगवान’ रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!

Sachin Tendulkar : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची सचिनसाठी प्रार्थना, म्हणाला, ‘सचिन कोरोनालाही सीमेपार पाठवेल”

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....