AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC : न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका, टीम इंडिया कितव्या स्थानी?

England vs New Zealand 1st Test Wtc 2025 2027 Points Table : इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने विजयी मिळवल्यानंतरही काहीही फायदा झाला नाही. तर न्यूझीलंडची थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

WTC : न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका, टीम इंडिया कितव्या स्थानी?
Kane Williamson ENG vs NZ TestImage Credit source: @englandcricket
| Updated on: Jun 07, 2026 | 11:35 PM
Share

न्यूझीलंड क्रिकेट टीम टॉम लॅथम याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली आहे. इंग्लंडने बेन स्टोक्स याच्या कॅप्टन्सीत ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये न्यूझीलंडवर सामन्यातील चौथ्याच दिवशी (7 जून) 115 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. इंग्लंडने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. तर पाहुण्या न्यूझीलंडला पराभवासह आणखी एक झटका लागला आहे. किवींची पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे. इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंडची थेट चौथ्या स्थानी घसरण

न्यूझीलंड इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान होती. मात्र 115 धावांनी झालेल्या मोठ्या पराभवामुळे न्यूझीलंडची थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर इंग्लंडला मोठ्या विजयानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये काहीही फायदा झालेला नाही. इंग्लंड सातव्या स्थानी कायम आहे.

ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी विराजमान

ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 84 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाने या साखळीत खेळलेल्या 8 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने फक्त 1 सामना गमावला आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडच्या विजयामुळे फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 36 गुण आहेत. श्रीलंका तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. बांगलादेश पाचव्या क्रमांकावर आहे.

टीम इंडिया सहाव्या स्थानी

टीम इंडिया सहाव्या स्थानी आहे. इंग्लंड सातव्या आणि पाकिस्तान आठव्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिज डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमधील नवव्या आणि शेवटच्या स्थानी  आहे.

WTC 2025-2027 पॉइंट्स टेबलमधील स्थिती

इंग्लंड-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना केव्हा?

दरम्यान क्रिकेट चाहत्यांना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याची प्रतिक्षा असणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 17 ते 21 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली