IPL 2021 : धोनीचं शस्त्र सज्ज, बॅटला धार चढवली, छन्‍नी-हातोड्याने बॅटला शेप, पाहा VIDEO

IPL 2021 : धोनीचं शस्त्र सज्ज, बॅटला धार चढवली, छन्‍नी-हातोड्याने बॅटला शेप, पाहा VIDEO
MS Dhoni

सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या बॅटची निरगाणी राखत असल्याचं दिसत आहे. छन्नी आणि हातोड्याने तो आपल्या बॅटला आकार देतो आहे. | MS Dhoni repair His bat Before IPL 2021

Akshay Adhav

|

Apr 01, 2021 | 12:48 PM

मुंबईआयपीएलच्या (IPL 2021) लढाईला आता काहीच दिवस बाकी राहिलेले असताना चेन्नईचा (Chennai Super Kings) कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याच्या बॅटची काळजी घेताना दिसून येत आहे. मॅचेस सुरु होण्याआधी छन्नी आणि हातोड्याने आपल्या बॅटला आकार देतानाचा धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होतोय. चेन्नई सुपर किंग्सने हा व्हिडीओ ट्विट केला असून चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून धोनी या हंगामात काय कमाल करणार, अशी उत्सुकता लागून राहिली आहे. (MS Dhoni repair His bat Before IPL 2021 CSK Video Share)

सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या बॅटची निरगाणी राखत असल्याचं दिसत आहे. छन्नी आणि हातोड्याने तो आपल्या बॅटला आकार देतो आहे. ही निगराणी राखून झाल्यानंतर धोनी आपल्या बॅटला ग्रीप लावत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसंच धोनी नेटमध्ये प्रॅक्टिस करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

युवा खेळाडूंवर धोनीची विशेष नजर

सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये खेळाडू आयपीएलची तयारी तर करतच आहेत परंतु त्याचबरोबर युवा खेळाडूंच्या खेळावर महेंद्रसिंग धोनीची विशेष नजर आहे. युवा खेळाडूंच्या बॅटिंग आणि बोलिंगवर धोनी नजर ठेऊन असल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे.

6000 धावा पूर्ण करण्याचं सुरेश रैनाचं लक्ष्य

चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धोनीशिवाय इतर खेळाडूही दिसत आहेत. ट्रेनिंग कॅम्पमध्ये सुरेश रैना तीन फलंदाजांना घेऊन त्यांना बॅटिंगचे काही धडे दिसत आहे. आयपीएल 2021 च्या हंगामात आयपीएल करिअरमधील 6000 धावा पूर्ण करण्याचं सुरेश रैनाचं लक्ष्य असेल.

प्रतिक्षा पहिल्या सामन्याची…

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(MS Dhoni repair His bat Before IPL 2021 CSK Video Share)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलमध्ये हे 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात!

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरसारखाच षटकार ठोकणारा खेळाडू हैदराबाद संघात दाखल, प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा!

IPL 2021 : चेतेश्वर पुजाराचे उत्तुंग षटकार, नेटकरी म्हणतात, धोनीच्या संगतीचा परिणाम?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें