AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्ताननं जगासमोर हसं करुन घेतलं, कोचच्या एका कृतीमुळे फजिती, Video Viral

Pakistan Cricket: महिला विश्वचषक २०२६ सध्या सुरु आहे. दुबईच्या इंटरनेशनल स्टेडियमवर सोमवारी पाकिस्तान आणि हॉगकाँगमध्ये सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानने हॉगकाँगचा 72 धावांनी पराभव केला होता.

पाकिस्ताननं जगासमोर हसं करुन घेतलं, कोचच्या एका कृतीमुळे फजिती, Video Viral
| Updated on: Sep 08, 2026 | 1:59 PM
Share

महिला विश्वचषक २०२६ सध्या सुरु आहे. दुबईच्या इंटरनेशनल स्टेडियमवर सोमवारी पाकिस्तान आणि हॉगकाँगमध्ये सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानने हॉगकाँगचा 72 धावांनी पराभव केला होता. या विजयानंतर ग्रुप अ मधून भारतासह पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचणारी दुसरी टीम ठरली. आता हॉगकाँगविरुद्ध जिंकल्यानंतर पाकिस्तानने जे केलं त्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

आता हॉगकाँगला हरवल्यानंतर पाकिस्तानचा कोचने जे केले त्याची चर्चा सुरु आहे. पाकिस्तान कोच वाहाब रियाजने स्टेडियमवर व्हिक्टरी परेड काढलेली पाहायला मिळाली. एखाद्या मोठ्या स्पर्धेची ट्रॉफी जिंकल्यानंतर व्हिक्टरी परेड काढली जाते तशी ही विक्ट्री परेड काढली. पण पाकिस्तानने फक्त हॉगकाँगला हरवल्यानंतर व्हिक्टरी परेड काढल्यामुळे त्यांची फजिती झाली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 143 धावा केल्या. पाकिस्तानकडून शवाल झुल्फीकार या खेळाडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त इतर कुणालाच मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या. तरी देखील पाकिस्तानने 143 धावांपर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली.

यानंतर हॉगकाँगसमोर 144 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हॉगकाँगची सुरुवात अतिशय खराब झाली होती. हॉगकाँगकडून केरी चानने सर्वाधिक 30 धावा केल्या होत्या, तर बाकी इतर खेळाडू एकेरी आणि दुहेरी धावा करून बाद झाले होते. त्यामुळे हॉगकॉगचा डाव 71 धावांत आटोपला त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 72 धावांनी जिंकला. पाकिस्तानकडून नशरा संधूने सर्वाधिक 6 विकेट, फातिमासना, सादिक इकबाल, उम्मे ई हन्नी आणि आयेशा जफरने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. या विजयाच्या बळावर पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये धडक घेतली आहे. दरम्यान सेमी फायनलला प्रवेश करताच पाकिस्तान हवेत उडू लागल्याचे दिसत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाने पाकिस्तानला 55 धावांत गुंडाळले. यानंतर भारतीय संघाने सहज सामना जिंकला. भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली. भारताच्या गोलंदाजी विभागाने पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की पळो केलेले दिसले.

Follow Us
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...