Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचललं मोठं पाऊल, पुन्हा मॅच फिक्सिंगची चर्चा, खेळाडूंकडून काढून घेतले…

Pakistan Cricket News: पाकिस्तान क्रिकेटमध्ये काहीच चांगले सुरु नसल्याच्या बातम्या खूप दिवसांपासून सुरु आहेत, आता पुन्हा एकदा त्याचे एक उदाहरण पाहायला मिळाले.

Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचललं मोठं पाऊल, पुन्हा मॅच फिक्सिंगची चर्चा, खेळाडूंकडून काढून घेतले...
| Updated on: Sep 06, 2026 | 11:30 AM

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असलेला पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संघाने आधीच सलग दोन सामने गमावून मालिका गमावली आहे. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर संघ इतका हादरला होता की, मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांनी तातडीने त्यांचे पद सोडले, तर बोर्डाने एका झटक्यात सात खेळाडूं परत पाठवले. दरम्यान, आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘365 न्यूज’च्या वृत्तानुसार, “खेळाडूंनी त्यांची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे पीसीबीकडे (PCB) जमा केली असून, ती अंतिम कसोटीपर्यंत बोर्डाकडेच राहतील. ज्या खेळाडूंचे फोन जप्त करण्यात आले आहेत, त्यांची ओळख या वृत्तात उघड करण्यात आलेली नाही आणि ही फोन का जप्त केली जात आहेत, हे पीसीबीने सार्वजनिकरित्या स्पष्ट केलेले नाही.”

भ्रष्टाचाराचा संशय असल्यास क्रिकेट बोर्ड मालिकेदरम्यान खेळाडूंचे मोबाईल फोन जप्त करण्याचे आदेश देते. पाकिस्तानी खेळाडूंचे मोबाईल फोन जप्त केले जाणार असल्याच्या माध्यमांतील वृत्तांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच-फिक्सिंगचे सावट पसरले आहे.

क्रिकेटमध्ये, सामन्यांदरम्यान खेळाडूंना मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला ड्रेसिंग रूमसह प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मोबाईल फोन किंवा इतर गॅझेट्स बाळगण्याची किंवा वापरण्याची परवानगी नाही. नियमांनुसार, टीम बसने सामन्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर खेळाडूंना त्यांचे गॅझेट्स तात्काळ जमा करणे आवश्यक आहे. हे गॅझेट्स सामन्यानंतर परत केले जातात. आयसीसीचे नियम असूनही पीसीबीने खेळाडूंचे फोन जप्त करण्याचा घेतलेला कथित निर्णय, मॅच-फिक्सिंगचा कोणताही तपास सुरू असल्याचे सिद्ध करत नाही.

व्हाइट-बॉल प्रशिक्षक माईक हेसन यांच्याकडे आता तिसऱ्या कसोटीसाठी कसोटी संघाचा अंतरिम कार्यभार सोपवण्यात आला आहे. लीड्स कसोटी आणि लॉर्ड्स कसोटी या दोन्ही सामन्यांच्या चारही डावांमध्ये २०० धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तान संघाने, आता एडजबॅस्टन येथील अंतिम कसोटीसाठी पाच नवोदित खेळाडूंसह सात नवीन चेहऱ्यांची घोषणा केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us