AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw: दोन दिवसांपूर्वी गर्लफ्रेंडसोबत पॅचअप अन् आता पृथ्वी शोने घेतला मोठा निर्णय, काय घडलं?

Prithwi Shaw Team India Comeback: पृथ्वी शोने आता भारतीय संघातील कमबॅक आणि घडलेल्या चूकांवर भाष्य केले आहे.

Prithvi Shaw: दोन दिवसांपूर्वी गर्लफ्रेंडसोबत पॅचअप अन् आता पृथ्वी शोने घेतला मोठा निर्णय, काय घडलं?
| Updated on: Oct 15, 2026 | 11:12 AM
Share

Prithvi Shaw Comeback: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ संघात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तो सध्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने या हंगामात सर्व्हिसेस संघाविरुद्ध एक रोमांचक विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात त्याच्या कर्णधारपदाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि सर्व्हिसेस संघाला सर्वबाद करून विजयही मिळवून दिला.

पृथ्वी शो काय म्हणाला?

महाराष्ट्राच्या विजयानंतर, पृथ्वी शॉने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना भारतीय संघात परतण्याच्या आपल्या प्रयत्नांविषयी सांगितले. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सविस्तर चर्चा केली. पृथ्वी म्हणाला, “भारतीय संघात परतणे हेच माझे सर्वात मोठे आणि अंतिम ध्येय आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सलामीवीरांची एक मोठी रांग आहे, त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावे लागते.”

पृथ्वी शॉ म्हणाला, “माझ्यासाठी कोणालाही काही सिद्ध करून दाखवण्याचा प्रश्न नाही. ही लढाई माझ्या आणि माझ्यातली आहे. मी पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करत आहे. सध्या मी सोशल मीडियापासून दूर आहे आणि फक्त तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे: माझे क्रिकेट, माझे कुटुंब आणि मी स्वतः. बाकी सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो आणि त्यांना बाजूला सारतो.”

तो म्हणाला, “मी घरीच राहण्याचा प्रयत्न करतो. मी अजूनही माझ्या कुटुंबासोबत जेवायला बाहेर जातो, पण मी शक्य तितके लोकांचे लक्ष टाळण्याचा प्रयत्न करतो. मी पापाराझींना कधीही आमंत्रित करत नाही. मला माझा वैयक्तित वेळ आनंदात घालवायला आवडतो.”

पृथ्वी शॉने कबूल केले की त्याच्याकडून काही चुका झाल्या आहेत, ज्यावर तो काम करत आहे. तो म्हणाला, “हो, या काळात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील. आयुष्यात कोणीही शंभर टक्के परिपूर्ण नसते. हे सर्व तुमच्या नशिबाचा भाग आहे. आता मी भूतकाळाकडे पाहत नाही. माझे संपूर्ण लक्ष पुढे जाण्यावर आहे. मला माझ्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत राहायचे आहे.”

Follow Us
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन