AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!

लाहोर कलंदर्सने Lahore Qalandars पेशावर झालमीवर (Peshawar Zalmi) 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. लाहोरकडून राशिद खानने (Rashid Khan) नाबाद 27 धावांची खेळी केली.

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!
लाहोर कलंदर्सने Lahore Qalandars पेशावर झालमीवर (Peshawar Zalmi) 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. लाहोरकडून राशिद खानने (Rashid Khan) नाबाद 27 धावांची खेळी केली.
| Updated on: Feb 21, 2021 | 8:16 PM
Share

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (Pakistan Super League 2021) सुरु आहे.  क्रिकेटच्या या छोट्या स्वरुपात मोठी फटकेबाजी, उत्तुंग चौकार आणि षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळते. या स्पर्धेत आज (21 फेब्रुवारी) पेशावर झालमी विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लाहोरच्या फिरकीपटू राशिद खानने गुडघ्यावर बसत धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट (Rashid Khan Helicopter Shot) मारत आपल्या टीमला विजय मिळवून दिला आहे. राशिद खानच्या या फटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (psl 2021 Lahore Qalandars Rashid Khan hit Helicopter Shot against Peshawar Zalmi)

राशिद खानचा हेलिकॉप्टर शॉट

सामन्याच्या दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर अमद बट टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर राशिदने गुडघ्यावर बसून जोरदार सिक्स खेचला. यासह लाहोरने 141 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 9 चेंडू राखून पार केलं. राशिद खानने 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकारासह ताबडतोड नाबाद 27 धावा केल्या. तर मोहम्मद हाफिजनेही सर्वाधिक नाबाद 33 रन्सची खेळी केली. तसेच पेशावरकडून वाहब रियाझ आणि साकिब महमूदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

141 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या लाहोरची सावध सुरुवात राहिली. फखर झमान आणि सोहेल अख्तर या जोडीने 29 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर लाहोरने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे लाहोरची 109-6 अशी बिकट स्थिती झाली. मात्र यानंतर मोहम्मद हाफिज आणि राशिद खान या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 37 धावांची नाबाद भागीदारी केली.

त्याआधी लाहोरने टॉस जिंकून पेशावरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पेशावरकडून रवी बोपाराने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तर शोएब मलिक आणि शेरफेन रुदरफोर्डने प्रत्येकी 26 धावांची खेळी केली. या तिकडीच्या जोरावर पेशावरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 140 धावा केल्या. लाहोरकडून शाहिन अफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर सलमान मिर्झाने 2 खेळाडूंना माघारी पाठवलं.

दरम्यान लाहोरने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकत जोरदार सुरुवात केली आहे. लाहोर पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कराची किंग विराजमान आहे.

संबंधित बातम्या :

विराट कोहलीच्या पावलावर पाऊल, पाकिस्तानच्या बाबर आझमचा PSL मध्ये किर्तीमान

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनासाठी धावून आला सचिनचा कट्टर मित्र, म्हणाला…..

(psl 2021 Lahore Qalandars Rashid Khan hit Helicopter Shot against Peshawar Zalmi)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...