विराट कोहलीच्या पावलावर पाऊल, पाकिस्तानच्या बाबर आझमचा PSL मध्ये किर्तीमान

PSLमध्ये कराची किंग्जकडून खेळलेल्या बाबर आझमने (Babar Azam) 20 फेब्रुवारीला क्वेटा ग्लेडिएटर्स विरूद्ध 24 धावा केल्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:55 PM, 21 Feb 2021
विराट  कोहलीच्या पावलावर पाऊल, पाकिस्तानच्या बाबर आझमचा PSL मध्ये किर्तीमान
PSLमध्ये कराची किंग्जकडून खेळलेल्या बाबर आझमने (Babar Azam) 20 फेब्रुवारीला क्वेटा ग्लेडिएटर्स विरूद्ध 24 धावा केल्या.

इस्लाामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान (Pakistan Super League) खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत दररोज नवनवे विक्रम होत आहेत. या स्पर्धेत शनिवारी 20 फेब्रुवारीला बाबर आझमने (Babar Azam) एक किर्तीमान रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने  (Virat Kohli)  ज्या प्रकारे आयपीएलच्या 13 व्या मोसमात जशी कामगिरी केली होती, त्याच प्रकारने बाबरने पीएसएल लीगमध्ये ही कामगिरी केली आहे. (babar azam become first player who leading run scorer in pakistan super league)

20 फेब्रुवारीला कराची किंग्स विरुद्ध क्वेटा ग्लडिएटर्स यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बाबरने छोटेखानी पण महत्वाची 24 धावांची खेळी केली. या खेळीसह बाबर या पीएसएल लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. बाबर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 22 धावा पू्र्ण करताच बाबर सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ठरला.

बाबरच्या नावावर या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजेच 1 हजार 540 धावांची नोंद आहे. कामरान अकमलला पछाडत बाबरने सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला आहे. कामरानने 1 हजार 537 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने आयपीएलच्या 13 व्या मोसमात मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला पछाडत सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला होता.

बाबरचे विराटच्या पावलावर पाऊल

बाबरने पीएसएलमध्ये जी कामगिरी केली ती कामगिरी विराटने आयपीएलमध्ये केली. पण दोन्ही खेळाडूंचा दोन वेगवेगळ्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यापर्यंतचा प्रवास जवळपास सारखाच होता. विराटला 13 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात राहिली. पण त्यानंतर त्याने झेप घेत सर्वाधिक धावांच्या शिखरावर जाऊन पोहचला. तसंच बाबरसोबत घडलं.

वाईट सुरुवात, गोड शेवट

विराटला आयपीएलच्या पहिल्या पर्वात धावांसाठी फार संघर्ष करावा लागला होता. पहिल्या मोसमात विराटने 12 डावांमध्ये 105 स्ट्राईक रेटने 165 धावा केल्या होत्या. त्याच प्रकारे बाबरसाठीही पीएसएलचा पहिला हंगाम फार चांगला राहिला नाही. PSL स्पर्धेचा पहिला मोसम 2016 मध्ये खेळवण्यात आला. यामध्ये बाबरने 2 डावात अवघ्या 15 धावा केल्या. दोघांसाठी या 2 वेगवेगळ्या स्पर्धेतील सुरुवात फार चांगली राहिली नाही. पण आज हे दोन्ही खेळाडू या स्पर्धेतील यशस्वी फलंदाज आहेत. हे दोन्ही खेळाडू टी 20 मधील टॉप स्कोरर खेळाडू आहेत.

संबंधित बातम्या :

IPL लिलावात कोणत्याच टीमने विकत घेतले नाही, ‘त्या’ खेळाडूने एकहाती फिरवला सामना

Ind vs Eng T 20 Series | 1 ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचत टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, ‘हा’ खेळाडू टी 20 मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढण्यासाठी सज्ज

( babar azam become first player who leading run scorer in pakistan super league)