AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला झटका, धोनीचा अपमान करणारा खतरनाक खेळाडू खेळणार नाही!

राज जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान सुरुवातीचा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाहीय. Rajasthan Royals Mustfijur rehman

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला झटका, धोनीचा अपमान करणारा खतरनाक खेळाडू खेळणार नाही!
Mustafijur rehman
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 03, 2021 | 2:52 PM
Share

मुंबई :  आयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काही दिवस राहिले आहेत. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers banglore) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला सामना पार पडतोय. सगळे संघ अंतिम तयारीला लागले आहेत. अशातच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला टूर्नामेंट सुरु होण्याअगोदरच मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा आक्रमक गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) राजस्थानच्या सुरुवातीलाच्या काही मॅचेस खेळू शकणार नाही. आता बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान (Mustfijur Rahman) सुरुवातीचा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाहीय. (Rajasthan Royals Mustfijur rehman Miss Punjab Kings opening Match of IPL 2021)

राजस्थान रॉयल्स 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएलचा पहिला सामना खेळणार आहे.परंतु नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यावर बांगलादेशच्या टी -20 संघात सहभागी असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान 4 एप्रिलला बांगलादेशात परत येईल. जरी तो दुसर्‍याच दिवशी भारतात आला, तरी त्याला किमान 7 दिवस तरी क्वारन्टाईन राहवं लागेल. तरच तो राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित खेळाडूंमध्ये सहभागी होऊ शकेल.

अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्स संघाला जोफ्रा आर्चर आणि मुस्तफिजूर रहमानशिवाय पंजाब किंग्जविरुद्धची पहिली लढत खेळावी लागणार आहे.

दुसऱ्या सामन्यातही मुस्तफिजूर बाहेर?

राजस्थान रॉयल्सचा दुसरा सामना 15 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. क्वारन्टाईनच्या कारणास्तव या सामन्यातही मुस्तफिजूर रहमान खेळू शकत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

राजस्थानने रहमानला 1 कोटी रुपये बेस प्राइसवर खरेदी केलं आहे. मुस्तफिजूरने 2016 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. त्यानंतर या लीगमधील 24 सामन्यांत त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही 16 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद अशी आहे. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 7.51 होता.

धोनीसह दिग्गजांचा अपमान करुन चर्चेत

मुस्तफिजुर रहमान महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) टीम इंडियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंचा अपमान करुन चर्चेत आला होता. 2015 मध्ये एक जाहिरात झाली होती, ज्यामध्ये मुस्तफिजुर रहमान कटरचं प्रमोशन करताना दिसला. या जाहिरातीमध्ये धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांचं अर्ध धड दाखवण्यात आलं होतं. यावेळी मुस्तफिजूरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

(Rajasthan Royals Mustfijur rehman Miss Punjab Kings opening Match of IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : बंदे में दम हैं… एकमेव खेळाडू, एका IPL हंगामात 300 पेक्षा अधिक रन्स आणि हॅट्रिकचा कारनामा!

MS धोनीचा करेक्ट कार्यक्रम, कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा बर्थडे सहकाऱ्यांबरोबर खास अंदाजात सेलिब्रेट!

IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...