MS धोनीचा करेक्ट कार्यक्रम, कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा बर्थडे सहकाऱ्यांबरोबर खास अंदाजात सेलिब्रेट!

चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super kings) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांचा वाढदिवस चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसहित (MS Dhoni) इतर सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:49 AM, 3 Apr 2021
MS धोनीचा करेक्ट कार्यक्रम, कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा बर्थडे सहकाऱ्यांबरोबर खास अंदाजात सेलिब्रेट!
चेन्नईचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा बर्थडे सहकाऱ्यांबरोबर खास अंदाजात सेलिब्रेट

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super kings) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांचा वाढदिवस चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसहित (MS Dhoni) इतर सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यासाठी धोनीने करेक्ट नियोजन आखलं होतं. संघातील सहकाऱ्यांच्या साथीने फ्लेमिंग यांनी केक कापत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी चेन्नईच्या टीममधील सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. (IPL 2021 MS Dhoni Celebrate Chennai Super kings head Coach Stephen Fleming Birthday Some Epic moment)

सीएसकेने शेअर केला खास व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजा कोच फ्लेमिंग यांच्या बर्थ डे पार्टीत मस्ती करताना दिसून येत आहेत. तसंच फ्लेमिंग यांनी वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करत संघातील इतक खेळाडूंना केक भरविला. रैनाने फ्लेमिंग यांच्या गालाला केक लावला त्यानंतर रैनाला त्यांनी आलिंगन देऊन या खास सेलिब्रेशनसाठी आभार मानले.

चेन्नईची पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्ससोबत

आपल्या आवडत्या चेन्नई संघाच्या मुख्य प्रशिक्षकांचा वाढदिवस असल्याने सीएसकेचे फॅन्सही ट्विटवर फ्लेमिंग यांना शुभेच्छा देत आहेत. तसंच आयपीएलच्या 14 व्या हंगामात जोरदार प्रदर्शनासाठी चेन्नईला शुभेच्छा देत आहेत. यंदाच्या मोसमातली चेन्नईची पहिली मॅच 10 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

धोनीचं शस्त्र सज्ज

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याच्या बॅटची काळजी घेताना दिसून येत आहे. मॅचेस सुरु होण्याआधी छन्नी आणि हातोड्याने आपल्या बॅटला आकार देतानाचा धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होतोय. चेन्नई सुपर किंग्सने हा व्हिडीओ ट्विट केला असून चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून धोनी या हंगामात काय कमाल करणार, अशी उत्सुकता लागून राहिली आहे.

(IPL 2021 MS Dhoni Celebrate Chennai Super kings head Coach Stephen Fleming Birthday Some Epic moment)

हे ही वाचा :

IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण

Video : ‘उडता अशरफ’, सुप्पर से भी उप्पर कॅच; तुम्हीही बघत राहाल!

IPL 2021 : यंदाचा आयपीएल करंडक कोण जिंकणार, तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स कुणाचा? दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी