AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 KKR vs RR: रॉबिन उथप्पाकडून मोठी चूक, ICC च्या नियमांचं उल्लंघन, कारवाईची टांगती तलवार!

यासर्व प्रकाराचा व्हिडिओ काव कॉर्नर या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे.(Rajasthan Royals Robin Uthappa applies saliva on ball)

IPL 2020 KKR vs RR: रॉबिन उथप्पाकडून मोठी चूक, ICC च्या नियमांचं उल्लंघन, कारवाईची टांगती तलवार!
| Updated on: Oct 01, 2020 | 3:47 PM
Share

दुबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं (IPL 2020) यूएईत आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आयपीएल स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. तर काही नवे नियम आणले गेले. आयसीसीच्या या नियमाचं राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) उल्लंघन केलं आहे. (Rajasthan Royals Robin Uthappa applies saliva on ball)

नेमकं काय घडलं ?

बुधवारी 30 सप्टेंबरला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर उथप्पाने सुनील नारायणचा (Sunil Narine) कॅच सोडला. यानंतर उथप्पाने चेंडू चमकवण्यासाठी त्यावर थुंकी लावली. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ काव कॉर्नर या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे रॉबिन उथप्पावर आयसीसीकडून (ICC) कारवाई होणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मात्र आयसीसीकडून याबाबत औपचारिक प्रतिक्रिया दिली नाही.

चेंडूला झळाली मिळण्यासाठी सामन्यादरम्यान अनेक खेळाडू थुंकी लावतात. तसेच घामाचा वापर करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीकडून काही नियम आखून दिले आहेत.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

नियमांनुसार, संबंधित खेळाडू चेंडूला थुंकी लावताना आढळल्यास त्याला पंचांकडून समज देण्यात यावा. मात्र पुन्हा अशीच चूक घडल्यास त्या संघाच्या कर्णधाराला ताकीद देण्यात यावी. आयसीसीच्या नियमांनुसार एका संघाला एका डावात 2 वेळा याबाबत कल्पना देण्यात यावी. मात्र यानंतरही जर चेंडूला थुंकी लावली, तर त्या संघाला दंड स्वरुपात 5 धावांची पेन्लटी लावण्यात यावी, असं आयसीसीच्या नियमांमध्ये सांगितलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले बदल

कोरोनाचा संसंर्ग व्यक्तीद्वारे पसरतो. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी यंदा प्रेक्षकांना स्टेडियममधून सामन्याचा आनंद घेता येणार नाही. म्हणजेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाही. सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंचा चेंडूला स्पर्श होतो. यासाठी  हात स्वच्छ करण्यासाठी मैदानात ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान कोलकाताने या सामन्यात राजस्थानच्या विजयी घौडदौडीला ब्रेक लावला. कोलकाताने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला.

संबंधित बातम्या :

आयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम ?

37 क्रिकेटपटूंची कोव्हिड-19 चाचणी, दोन खेळाडू बाधित

(Rajasthan Royals Robin Uthappa applies saliva on ball)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.