AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम ?

काही दिवस आयसीसीचे मुख्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. | ( Corona infection in ICC headquarters staff )

आयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम ?
| Updated on: Sep 27, 2020 | 5:01 PM
Share

दुबई : आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच (ICC) आयसीसीच्या दुबईतील मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आयसीसीच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यालयातील काही कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याची माहिती आयसीसीच्या एका वरिष्ठ सदस्याने दिली आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबात आयसीसीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ( Corona infection in ICC headquarters staff )

या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना यूएईतील आरोग्य विभागाच्या नियमांनुसार क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही दिवस आयसीसीचे मुख्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे आता मुख्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना काही दिवस आपल्या घरुनच काम करावे लागणार आहे.

आयपीएल स्पर्धेवर परिणाम ?

आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे आता आयपीएल (IPL 2020) स्पर्धेवर याचा परिणाम होणार का, अशी चर्चा क्रीडा क्षेत्रात पाहायला मिळत आहे. मात्र या घटनेचा आयपीएल स्पर्धेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. यूएईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. पण आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांना दुबईमधील अ‍ॅकेडमी वगळता आयसीसी अॅकेडमीच्या मैदानात सराव करता येणार आहे.

कोरोनाचा क्रीडा स्पर्धांना फटका

कोरोनामुळे जसा इतर क्षेत्रांना फटका बसला, तसाच फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. भारतातील कोरोना परिस्थितीमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान यूएईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. आतापर्यंत यूएईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्या पार गेला आहे.

संबंधित बातम्या :

नीतू डेव्हिड भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय निवड समितीच्या प्रमुखपदी

IPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी

( Corona infection in ICC headquarters staff )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.