Ravindra Jadeja: नवा गडी, नवं राज्य! चार वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या जडेजाला धक्का, काय घडलं?

Ravindra Jadeja News: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा मागील काही काळापासून सलग सामने खेळत नाहीये. आता याचा परिणाम जडेजाच्या रँंकिंगवर झाला आहे.

Ravindra Jadeja: नवा गडी, नवं राज्य! चार वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या जडेजाला धक्का, काय घडलं?
| Updated on: Oct 29, 2026 | 8:50 AM

Ravindra Jadeja Ranking: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा मागील काही काळापासून सलग सामने खेळत नाहीये. आता याचा परिणाम जडेजाच्या रँंकिंगवर झाला आहे. आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत, जडेजा एका स्थानाने घसरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. हा भारतीय क्रिकेटपटू गेल्या चार वर्षांपासून या यादीत अव्वल स्थानी होता. यामुळे आता मागील चार वर्षांचे वर्चस्व एका झटक्यात संपुष्टात आले आहे. त्याचप्रमाणे, ईशान किशनही टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ११३ धावांची विक्रमी खेळी करणारा भारताचा अभिषेक शर्मा अव्वल खेळाडू ठरला आहे.

गेल्या चार वर्षांपासून अव्वल कसोटी अष्टपैलू खेळाडू असलेला रवींद्र जडेजा ताज्या क्रमवारीत ४२२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सायमन हार्मनने २२८ रेटिंग गुणांसह १५ स्थानांनी झेप घेत अव्वल १० खेळाडूंमध्ये आठवे स्थान पटकावले आहे.

Loading...

दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन ४५१ च्या रेटिंगसह आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. पहिल्या पाचमध्ये कोणताही बदल झालेला नाही. घाटाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जानसेनने एकूण सहा बळी घेतले आणि ८५ धावा केल्या.

बांगलादेशचा मेहदी हसन मिराज आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. वेन मल्डर चौथ्या क्रमांकावर, तर मिचेल स्टार्क पाचव्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजानंतर वॉशिंग्टन सुंदर हा अव्वल १० मध्ये स्थान मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. सुंदर २३४ च्या रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सन पाच स्थानांनी पुढे जात क्रमांक १ कसोटी गोलंदाज बनला आहे. येथे त्याने मिचेल स्टार्कचे वर्चस्व संपुष्टात आणले, जो आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us