AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड हजारासाठी तडकाफडकी काढलं, वाईट पद्धतीने बाजूला केलं..; ‘आमने सामने’ नाटकातील रोहन-केतकीचा नवा व्हिडीओ

'आमने सामने' या नाटकाचे निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नाण्याची दुसरी बाजू मांडल्यानंतर आता रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी आणखी काही दावे केले आहेत.

दीड हजारासाठी तडकाफडकी काढलं, वाईट पद्धतीने बाजूला केलं..; 'आमने सामने' नाटकातील रोहन-केतकीचा नवा व्हिडीओ
लीना भागवत- मंगेश कदम, रोहन गुजर-केतकी पालवImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2026 | 8:38 AM
Share

‘आमने सामने’ या मराठी नाटकाचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आहे. रोहन गुजर आणि केतकी पालव या कलाकारांनी तडकाफडकी नाटकातून काढल्याचा आरोप केल्यानंतर निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी त्यांची बाजू मांडली. रोहन आणि केतकी यांनी तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितल्याचा दावा त्यांनी केला. यावर आता पुन्हा एकदा रोहन आणि केतकीने स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या बाजूने पूर्णविराम.. असं कॅप्शन देत त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाले रोहन आणि केतकी?

“आम्ही आमच्या निर्मात्यांचा (लीना भागवत, मंगेश कदम) व्हिडीओ पाहिला. आम्ही त्याखालच्या कमेंट्स वाचल्या, नाण्याची दुसरी बाजू आम्ही ऐकली. पण ती बाजू मांडत असताना अनवधानाने, चुकून, सोयीस्कररित्या, मुद्दामून काही मुद्दे आली नाहीत. ते मांडण्यासाठी आम्ही हा व्हिडीओ करतोय. या व्हिडीओनंतर आम्हालासुद्धा असा कुठलाही व्हिडीओ करण्याची अजिबात इच्छा नाही. आमच्या निर्मात्यांनी तिसरी मानधनवाढ हे जितक्या ठामपणे सांगितलं, तितक्या ठामपणे त्यांनी हे नाही सांगितलं की आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ. आता असा समज झाला आहे की एका वर्षांत आम्ही तीन वेळा पैसे वाढवून मागितले. तर तसं नाहीये,” असं ते म्हणाले.

याविषयी त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “आठ वर्षांत तिसरी मानधनवाढ.. जर सरासरी काढायला गेलो तर अडीच-पावणे तीन वर्षांनंतर एक मानधनवाढ. पहिली मानधनवाढ आमची झाली ती चार वर्षांनंतर.. जी अत्यंत किरकोळ होती, हे स्वत: निर्मात्यांनी मान्य केलं. दुसरी मानधनवाढ झाली ती सहा वर्षांनी. त्यामध्ये एकदा आमचं नाटक बंद पडलं, ते परत नव्याने सुरू झालं. त्यानंतर हाऊसफुल प्रयोग चारएक महिने झाले आणि त्यानंतर आम्ही मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला. सहा वर्षांनंतर सहा वर्षांच्या हिशोबाने जेवढी बेसिक मानधनवाढ आम्हाला मिळायला हवी, तो आकडा आम्ही त्यांच्यासमोर ठेवला, तो प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला. सगळे मेसेजेस आमच्याकडेही आहेत. ते व्हिडीओमध्ये म्हणाल्या की, त्यांच्या मागण्या आम्ही सहज मान्य केल्या, ते चुकीचं आहे.”

पहा व्हिडीओ-

“त्यांचं एक वाक्य मी वाचून दाखवते.. निर्माता म्हणून मी स्वत: मुरड घालून मी ही वाढ करत आहे.. असो. मुरड घालून.. मनाविरुद्ध.. म्हणजे ही मानधनवाढसुद्धा त्यांनी मनापासून केलीच नव्हती. तिसरी मानधनवाढ बरोबर वर्षानंतर आम्ही आता करत होतो. या सात वर्षांनंतर आमचे निर्माते कधीच स्वत:हून येऊन बोलले नाहीत की, आपलं नाटक छान चाललंय, बुकिंग चांगलं होतंय, हाऊसफुल होतंय, तर आता आपण तुमचे पैसे वाढवुयात.. असं कधीही झालं नाही. मानधनवाढीच्या वेळी आम्ही त्यांना हेसुद्धा स्पष्ट केलं की, जर नाटकाचं बुकिंग उतरलं, तर आम्ही पुन्हा पाकिटाचा विचार करू आणि कमी पाकिटात पुन्हा प्रयोग करायला तयार होऊ. पण आम्हाला हे नाटक शेवटपर्यंत करायचं आहे,” असं रोहन आणि केतकी म्हणाले.

“लॉकडाऊनमध्ये जेव्हा 50 टक्के प्रेक्षकमर्यादा होती, तेव्हा त्यांनी आम्हाला मानधनसुद्धा 50 टक्के देणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हासुद्धा आम्ही लगेच तयार झालो. दीड हजार जर आम्ही मागत असू आणि ती मुलं मागत आहेत जी गेली सात वर्षे नाटकात आहेत, सात वर्षे ही खूप मोठी कमिटमेंट आहे. आम्ही इमाने-इतबारे तुमच्याबरोबर एक टीम म्हणून सात वर्षे नाटक करतोय, तर ते दीड हजार तुम्हाला मोठे वाटतात, त्या दीड हजारासाठी तुम्ही आम्हाला रिप्लेस करता, तडकाफडकी.. या गोष्टीचं जर आम्हाला वाईट वाटत नसेल तर..,” असं सांगताना रोहन नि:शब्द होतो.

या व्हिडीओच्या शेवटी केतकी तिच्या भावना व्यक्त करत म्हणते, “या गोष्टीचा त्रास होतोय की जिथे इतकं मन लावून, इतक्या कमिटमेंटने काम केलं, ज्या लोकांबरोबर आम्ही इतके खांद्याला खांदे लावून उभे राहिलो. जेव्हा चांगले दिवस आले, तेव्हा त्यातून आम्हाला खूपच वाईट पद्धतीने बाजूला केलं गेलं.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान