संघातून ज्याला सतत डावललं त्यानेच बीसीसीआयचे तोंड बंद केले, रणजी ट्रॉफीमध्ये जे केलं ते पाहाच…
Rinku Singh News: रिंकू सिंग भारतीय संघातून अनेक काळापासून दूर आहे. आता त्याने बीसीसीआयचे तोंड बंद केले आहे.

Rinku Singh Ranji Trophy: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका पार पडली. जी २-२ ने बरोबरीत सुटली. आता न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होईल. कसोटी, वनडे आणि टी-२० सामने असणार आहे. न्यूझीलंड मालिकेसाठी संघात रिंकू सिंगची निवड करण्यात आली नाही. आता या मालिकेपूर्वी रिंकू सिंगने अशी कामगिरी केली की सर्वांचेच तोंड बंद केले आहे.
उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज, रिंकू सिंग, सध्या सर्वात मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचे सामने गाजवत आहे. आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळीने तो पुन्हा एकदा निवड समितीला आव्हान करत आहे. त्याच्या प्रभावी कामगिरीनंतरही, रिंकू सिंगला भारतीय संघातून वगळल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. झिम्बाब्वे टी-२० मालिकेपासून रिंकू राष्ट्रीय संघाबाहेर आहे आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली नाही.
रिंकू सिंगचा रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकुळ
रिंकू सिंगने चालू रणजी ट्रॉफी हंगामातील आपल्या उत्कृष्ट कामगिरीने खळबळ उडवून दिली आहे. त्याने बिहारविरुद्ध शानदार ११२ धावा केल्या आणि त्यानंतर गोव्याविरुद्ध नाबाद ११८ धावा केल्या. गोव्याविरुद्धच्या सामन्यात, सुरुवातीच्या धक्क्यांनंतर उत्तर प्रदेशचा संघ गडबडला. अवघ्या ३३ धावांत तीन विकेट पडल्या. अशावेळी रिंकू तारणहार म्हणून क्रीजवर उभा राहिला. त्याने आपल्या नाबाद शतकादरम्यान ११ चौकार आणि दोन षटकार ठोकले आणि संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, रिंकू सिंगने ५४ सामन्यांतील ७७ डावांमध्ये ५९.५२ च्या सरासरीने ३,८६९ धावा केल्या आहेत, ज्यात १० शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. ७० लिस्ट ए सामन्यांमध्ये, त्याने ५२.५६ च्या प्रभावी सरासरीने २,४१८ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबर २०२६ पासून मालिकेला सुरुवात होणार आहे. आता यानंतरच्या मालिकेत तरी रिंकू सिंगला संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
