AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma Video: रोहित शर्मा बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण विराट मात्र पाहतच राहिला…Video Viral

Rohit Sharma Video Viral: भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभवाचा दणका दिल्यानंतर आता टीम बस हॉटेलला पोहोचली असता रोहित शर्मासोबत जे घडलं त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Video: रोहित शर्मा बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण विराट मात्र पाहतच राहिला...Video Viral
| Updated on: Sep 28, 2026 | 1:38 PM
Share

Rohit Sharma Video Viral: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु असून पहिला सामना हा काल रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनीही शतक झळकावले. आता सामना संपल्यानंतर जेव्हा टीम बसने खेळाडू हॉटेलला जात होते तेव्हा मात्र रोहित शर्मासोबत एका अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्माचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बसमधून उतरताना घसरला. तो घसरत आहे हे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हॉटेलवर पोहोचल्यानंतर टीम बसमधून उतरत असताना हे घडल्याचे समजत आहे. रोहित पायऱ्यांजवळ पोहोचताच तो वाईट रीतीने घसरतो. रोहितला पडताना पाहून, तिथे उपस्थित असलेले सुरक्षा कर्मचारी त्याच्या मदतीसाठी धावून येतात.

रोहितची अवस्था पाहून विराटही चिंतेत

बसमधून घसरल्यानंतर रोहितला किती गंभीर दुखापत झाली हे अद्याप कळलेले नाही, पण त्यामुळे विराट कोहलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचे दिसत आहे. विराट पुढे गेला होता, पण मागे रोहित पडल्याचे त्याला समजताच त्याने मागे वळून पाहिले. तो कासावीस झाल्याचेही त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे दिसत आहे. पण दूर उभा असल्याने तो काही करु शकला नाही. आता रोहितला दुखापत झाली का? आणि जर झाली तर ती दुखापत किती गंभीर आहे? जर गंभीर असेल तर त्याला पुढील सामन्यात खेळता येणार की नाही? असे सर्व प्रश्न आता चाहत्यांचा मनात निर्माण झाले आहेत. ३० सप्टेंबर २०२६ ला दुसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना हा गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ८ गडी राखून पराभूत केले. भारताच्या विजयात रोहित शर्माचे योगदान ३२ धावांचे होते, ज्या त्याने ३५ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने केल्या. रोहितने शुभमन गिलसोबत ७४ धावांची सलामीची भागीदारी केली.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल