AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: लेक सारासाठी सचिन तेंडुलकरच्या मनात दाटल्या भावना; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले…

Sachin Tendulkar Post For Sara Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी सारा तेंडुलकरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अतिशय भावनिक आहे.

Sachin Tendulkar: लेक सारासाठी सचिन तेंडुलकरच्या मनात दाटल्या भावना; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले...
| Updated on: Oct 12, 2026 | 12:20 PM
Share

Sachin Tendulkar Post: ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपली मुलगी सारा तेंडुलकरच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक संदेश लिहिला आहे. सचिनच्या पोस्टमधून एका वडिलांचे प्रेम, आपल्या मुलीला मोठे होताना पाहून होणारा आनंद आणि तिला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना पाहून वाटणारा अभिमान स्पष्टपणे दिसून येतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या संदेशात, सचिनने वडील-मुलीचे नाते काळानुसार कसे बदलते हे स्पष्ट केले आहे.

सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “एक काळ होता जेव्हा मी तुला मार्ग दाखवायचो. आता, बहुतेक वेळा, तू तुझा स्वतःचा मार्ग निवडताना पाहून मला आनंद होतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सारा. माझं तुझ्यावर प्रेम आहे.”  सचिन तेंडुलकरच्या संदेशातून आपल्या मुलीची प्रगती पाहून होणारा आनंद आणि तिच्या निर्णयांबद्दलचा आदर दिसून येतो. एकेकाळी साराचा हात धरून तिला मार्गदर्शन करणारा सचिन, आता तिला तिच्या स्वतःच्या मार्गावर पुढे जाताना पाहून आनंदी आहे.

सारा तेंडुलकरचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईत झाला. साराने तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. साराचे नाव अनेकांसोबत जोडलेले पाहायला मिळते.

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलसोबत साराचे नाव जोडलेले पाहायला मिळाले आहे. अनेकदा ते दोघे एकत्र अनेक पार्टींमध्ये एकत्र दिसले होते. ते परदेशात फिरायलाही एकत्र गेल्याचे व्हायरल फोटो समोर आले आहेत. याबद्दल दोघांनीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

साराने मागच्या वर्षी एक पिलेट्स अकादमी सुरू केली आहे. तिने ही अकादमी मुंबईतील अंधेरी येथे सुरू केली आहे. ते महिलांच्या आरोग्यासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी काम करते. पीसीओडी संबंधातील समस्या असो किंवा मानिसक आरोग्या संदर्भातील प्रश्न सोडवण्यावर भर दिला जातो.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...