
आधी शुबमन गिलला नडला. मग साई सुदर्शनसोबत वाद घातला. आता वाद घातला, तर त्याचं सडेतोड प्रत्युत्तरही मिळालं. भारत-इंग्लंड टेस्ट सीरीजमध्ये आणखी एक वाद झालाय. शुबमन गिलला नडणाऱ्या बेन डकेटशी ओव्हल टेस्टच्या दुसऱ्यादिवशी साई सुदर्शनच जोरदार वाजलं. सगळ्यांसमोर मैदानात जेव्हा असं घडलं, तेव्हा त्याचा व्हिडिओ सुद्धा वेगाने व्हायरल झाला. आता प्रश्न हा आहे की, इंग्लंड विरुद्ध 140 रन्स ठोकणाऱ्या साई सुदर्शन आणि बेन डकेटमध्ये इतका वाद का झाला?.
बेन डकेट आणि शुबमन गिल दरम्यान लॉर्ड्स टेस्टमध्ये वाद झालेला. बेन डकेट तेव्हा ओपनिंग पार्टनर जॅक क्रॉलीसोबत मिळून तिसऱ्यादिवशी खेळाची गती धिमी करण्याचा प्रयत्न करत होता. आता ओव्हल टेस्टमध्ये बेन डकेट आणि साई सुदर्शनमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. साई सुदर्शन टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतता होता.
त्याने पलटून उत्तर दिलं
दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसन 18 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरचा दुसरा चेंडू समजण्यात साई सुदर्शन कमी पडला. तो LBW आऊट झाला. साई सुदर्शनला डाऊट असल्याने त्याने DRS ची मदत घेतली. पण निकाल बदलला नाही. आता तो आऊट होऊन तंबूत परतत होता, त्यावेळी बेन डकेट त्याला काहीतरी बोलला. त्यावर साई सुदर्शन चिडला. त्याने पलटून उत्तर दिलं.
साई सुदर्शन मागे वळला
दोघांमध्ये कुठल्या विषयावरुन वाद झाला, ते समजलं नाही. पण फोटोंवरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की, बेन डकेट जे काही बोलला, ते साई सुदर्शनला सहन झालं नसेल. बेन डकेटला सुनावण्यासाठी पॅव्हेलियनकडे निघालेला साई सुदर्शन मागे वळला.
Some Heated words exchange with Ben Ducket and Sai Sudarshan, c’mon Sai perform and then speak.#INDvsENG #Saisudarshan #BenDuckett pic.twitter.com/OifqJhFxeL
— Pawan Mathur (@ImMathur03) August 1, 2025
साई सुदर्शनने 140 धावा कधी केल्या?
तुम्ही म्हणाल बेन डकेट सोबत वाद ठीक आहे. पण या दरम्यान इंग्लंड विरुद्ध साई सुदर्शनने 140 धावा कधी केल्या?. इतक्या धावा त्याने इंग्लंड विरुद्ध संपूर्ण टेस्ट सीरीजमध्ये केल्या आहेत. बेन डकेट सोबत वाद झाला, त्या इनिंगमध्ये साई सुदर्शनने फक्त 11 धावा केल्या. इंग्लंड विरुद्ध तीन टेस्ट मॅचच्या 6 इनिंगमध्ये त्याने 18 चौकारांसह 140 धावा केल्या आहेत. यात त्याची फलंदाजीची 23.33 सरासरी आहे. साई सुदर्शनची ही डेब्यू टेस्ट सीरीज होती. यात त्याचा बेस्ट स्कोर आहे 61.