हॅटट्रिकवीर सॅम करन! वडील झिम्बावेकडून, मुलगा इंग्लंडकडून, तीन भाऊ, तिघेही क्रिकेटर

DCvsKXI मोहाली: आयपीएलच्या मैदानात आणखी एक थरारक सामना रंगला. श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आर अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने शेवटच्या षटकात बाजी मारली. पंजाबच्या या विजयाचा हिरो ठरला तो 20 वर्षीय गोलंदाज सॅम करन (Sam Curran). शेवटच्या षटकात हॅटट्रिक घेत, मूळच्या इंग्लंडच्या सॅम करनने दिल्लीच्या तोंडातील विजयाचा घास अक्षरश: हिरावला. सॅम करनच्या या हॅट्रिकमुळे पंजाबला […]

हॅटट्रिकवीर सॅम करन! वडील झिम्बावेकडून, मुलगा इंग्लंडकडून, तीन भाऊ, तिघेही क्रिकेटर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

DCvsKXI मोहाली: आयपीएलच्या मैदानात आणखी एक थरारक सामना रंगला. श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आर अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने शेवटच्या षटकात बाजी मारली. पंजाबच्या या विजयाचा हिरो ठरला तो 20 वर्षीय गोलंदाज सॅम करन (Sam Curran). शेवटच्या षटकात हॅटट्रिक घेत, मूळच्या इंग्लंडच्या सॅम करनने दिल्लीच्या तोंडातील विजयाचा घास अक्षरश: हिरावला. सॅम करनच्या या हॅट्रिकमुळे पंजाबला विजय मिळवता आला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 9 बाद 166 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दिल्लीला 19.2 षटकात 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे पंजाबने हा सामना 14 धावांनी जिंकला.

सॅम करनची हॅटट्रिक

सॅम करनने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. या हॅटट्रिकसह 20 वर्षीय सॅम करनने क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. सॅम करन हा झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू केविन करन यांचा मुलगा आहे.

सॅम करन हा वयाच्या 10 व्या वर्षांपासून आयपीएल पाहात आला आहे. टीव्हीवर आयपीएल पाहिल्यानंतर आपणही या स्पर्धेचा भाग असावं अशी त्याची इच्छा होती.

आयपीएल-12 मध्ये सॅम करन 2 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एका हॅटट्रिकसह 6 विकेट्स घेतल्या आहेत. सॅम करनच्या करिअरवर प्रकाशझोत टाकायचा झाल्यास, तो 49 टी 20 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 48 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने दोनवेळा 4-4 विकेट्स पटकावल्या आहेत.

सॅम करन इंग्लंडकडून आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत. तर 3 अर्धशतकांसह 454 धावाही ठोकल्या आहेत. सॅमने  2 वन डे सामन्यात 2 विकेट्स पटकावल्या आहेत.

अष्टपैलू सॅम करनला कर्णधार अश्विनने फलंदाजीसाठी थेट सलामीला पाठवलं. सॅमने 10 चेंडूत 20 धावा केल्या.

वडील झिम्बावेकडून, मुलगा इंग्लंडकडून मैदानात

सॅम करन इंग्लंडकडून खेळतो. मात्र त्याचे वडील झिम्बाब्वेकडून खेळत होते.  सॅमने जून 2018 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळवलं.

तीन भाऊ, तिघेही क्रिकेटर

सॅम करन हे तीन भाऊ आहेत. हे तिघेही क्रिकेटर आहेत. सॅम करन सर्वात लहान आहे. सॅमचा सर्वात मोठा भाऊ टॉम करन इंग्लंडकडून खेळतो. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. सॅमचा मधला भाऊ मेलबर्न क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतो.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.