AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झा कोणाच्या प्रेमात? घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल दिले थेट मोठे संकेत, म्हणाली, एकटे…

सानिया मिर्झाचा काही महिन्यांपूर्वी शोएब मलिकसोबत घटस्फोट झाला. मात्र, घटस्फोटानंतर आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे टाळताना सानिया मिर्झा दिसली. आता तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.

सानिया मिर्झा कोणाच्या प्रेमात? घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल दिले थेट मोठे संकेत, म्हणाली, एकटे...
Sania Mirza second marriage
| Updated on: Nov 22, 2025 | 11:54 AM
Share

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. सानियाने पाकिस्ताने क्रिकेटर शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतला. शोएबने लगेचच तिसरे लग्नही केले. मात्र, सानिया मिर्झा अजूनही सिंगल आहे. ज्यावेळी हे नाते तुटण्याच्या रस्त्यावर होते, त्यावेळी आपल्याला कशाप्रकारचा त्रास होत होता आणि घटस्फोटानंतर आयुष्यात काय काय बदल झाले हे सानिया मिर्झा सांगताना दिसली. शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर अनेक दिवस शांत राहण्याचा प्रयत्न सानियाने केला. यावेळी आपली अवस्था कशी होती हे देखील तिने सांगितले. ती थरथर कापत होती आणि तसेच काम करत होती. सानिया आणि शोएब मलिक यांचा एक मुलगा असून त्याची जबाबदारी सानिया मिर्झावर आहे. सानिया आपल्या लेकासोबत दुबईतच राहते.

करण जोहर याच्यासोबत शोमध्ये बोलताना सानिया मिर्झा हिने अनेक गोष्टींवर थेटपणे भाष्य केले. हेच नाही तर यावेळी ती सिंगल पालक असल्याने कोणकोणत्या गोष्टींना सामोर जावे लागते हे सांगताना दिसली. मुलाला एकट्याला दुबईत सोडून भारतात कामानिमित्त येणे ही सर्वात कठीण गोष्ट असल्याचे सानिया मिर्झाने स्पष्ट म्हटले. हेच नाही तर रात्री एकटे बसून जेवण देखील जात नसल्याचे सानियाने म्हटले. एकटे बसून काय जेवण करायचे…

सानिया मिर्झा हिच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवत होते की, तिला एकटे राहणे किती जास्त कठीण आहे. ती रात्री जेवण देखील करत नाहीये. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटानंतर सानियाचे नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी याच्यासोबत जोडले गेले होते. मात्र, यावर सानिया किंवा मोहम्मद शमी या दोघांनीही अजिबात बाष्य केले नाही. सानियाला सध्या तिच्य आयुष्यात एकटेपणा जाणवत आहे.

सानियाच्या बोलण्यावरून जाणवत होते की, तिला तिच्या आयुष्यात जोडीदाराची नक्कीच गरज आहे. सानिया मिर्झाने दुसरे लग्न करण्याचे मोठे संकेत दिले आहेत. सानियाने शोएब मलिक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शाहिद कपूरला डेट केल्याचे सांगितले जाते. अनेक लोकांसोबत सानियाचे नाव जोडली गेली आहेत. आता सानिया खरोखरच दुसरे लग्न करते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!