Shikhar Dhawan : घटस्फोटानंतर शिखर धवन पूर्व पत्नीला महिन्याला देतोय तब्बल इतकी पोटगी; 8 वर्षातील रक्कम जाणून व्हाल थक्क!
Shikhar Dhawan : दोन मुलींची आई आणि 10 वर्ष मोठ्या महिलेसोबत संसार गब्बरला पडला अत्यंत महागात... शिखर घटस्फोटानंतर पूर्व पत्नीला महिन्याला देतो मोठी रक्कम... 8 वर्षातील रक्कम जाणून व्हाल थक्क!

Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याचं आयेशा मुखर्जी हिच्यासोबत घटस्फोट झाला आहे. 4 ऑक्टोबर 2023 मध्ये न्यायालयाने शिखर आणि आयेशा यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. फेसबुक फ्रेंडपासून सुरु झालेली त्यांनी मैत्री लग्नापर्यंत पोहोचली. दोघांनी लग्नानंतर मुलाचं देखील जगात स्वागत केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला. आयेशा हिच्यासोबत शिखर याला लग्न फार महागात पडलं. त्याने कोट्यवधी रुपये गमावले, मानसिक छळ सहन केला पण तरीही तो त्याचे लग्न वाचवू शकला नाही.
शिखर आणि आयेशाची मैत्री शिखरने पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्टमधून सुरू झाली. आयेशाने ती स्वीकारली आणि त्यांची प्रेमकहाणी वेगाने पुढे सरकली. 2009 मध्ये त्यांचं लग्न झालं पण, मुलगा झोरावरच्या जन्मानंतर परिस्थिती बदलू लागली. दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. ते वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले.
8 वर्षांत 13 कोटी खर्च…
आयेशा हिचा घटस्फोट झालेला. त्यानंतर तिची ओळख शिखर याच्यासोबत झाली. तेव्हा आयेशा दोन मुलींची आई होती. आयेशा वयाने देखील शिखर याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. पण शिखर तिच्या प्रेमात पूर्ण बुडालेला होता. त्यामुळे त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत फक्त भावनांना महत्त्व दिलं आणि आयेशा हिच्यासोबत लग्न केलं. पण लग्न यशस्वी ठरलं नाही. घटस्फोटाच्या काळात 8 वर्षात शिखर तब्बल 13 कोटी रुपये मोजावे लागले. शिखरने त्याच्या कुटुंबासाठी ऑस्ट्रेलियामध्ये तीन मालमत्ता देखील खरेदी केल्या. यापैकी दोन मालमत्तांची आयेशा एकमेव मालक आहे.
लग्नानंतर पूर्व पत्नीला किती पोटगी देतो शिखर
रिपोर्टनुसार, शिखर पूर्व पत्नी आयेशा हिला वर्षाला 1.25 कोटी रुपये देतो… म्हणजे शिखर महिन्याला आयेशा हिला 10 लाख रुपये देतो. 1.25 कोटी रुपयांशिवाय शिखर दोन मुली आणि त्याच्या मुलाचा महिन्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च देखील देतो. रिपोर्टनुसार, आयेशा हिने शिखर याच्याकडून 13 कोटींची माहणी केली होती. पण घटस्फोट झालेलं नसताना शिखर याने आयेशा हिच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केलेले.
शिखर याचं दुसरं लग्न
फेब्रुवारी मधील तिसऱ्या आठवड्यात सोफी शाइन आणि शिखर धवन लग्न करणार आहे. हे लग्न दिल्ली-एनसीआरमध्ये होणार आहे. त्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. दोघांचं लग्न अत्यंत साधे आणि खाजगी असेल. अशी माहिती सध्या समोर येत आहे.
