AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: अरे तो राज्य करेल तुम्ही जरा थांबा…वैभव सूर्यवंशीबद्दल श्रेयस अय्यर जे बोलला ते ऐकदा वाचाच

Vaibhav Sooryavanshi News: वैभव सूर्यवंशीबद्दल भारतीय टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरने जे विधान केले त्याची आता चर्चा होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: अरे तो राज्य करेल तुम्ही जरा थांबा...वैभव सूर्यवंशीबद्दल श्रेयस अय्यर जे बोलला ते ऐकदा वाचाच
| Updated on: Oct 05, 2026 | 9:32 AM
Share

IND vs WI T20: आशियाई क्रीडा स्पर्धेचा फायनल सामन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघ असा सामना रंगला. या फायनल सामवन्यात वैभव सूर्यवंशीला विशेष कामगिरी करता आलेली नाही. वैभवच्या या कामगिरीचा आता पुढील मालिकेवरही परिणाम पडणार आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता उद्यापासून वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतही आता वैभवचा पत्ता कट होणार की त्याला संधी मिळणार, यावर श्रेयस अय्यरने आता विधान केले आहे.

श्रेयस वैभवबद्दल काय म्हणाला?

भारताचा टी२० कर्णधार, श्रेयस अय्यरने १५ वर्षीय स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. श्रेयस म्हणाला की,  “वैभव सूर्यवंशीची वेळ आली की तो क्रिकेटवर राज्य करेल. मी जाणूनबूजून वैभवसोबत क्रिकेटसंदर्भातील गोष्टींवर चर्चा करणं टाळतो, मी त्याच्याशी पसर्नल आयुष्यासंदर्भात गप्पा मारतो म्हणजे चांगले संबंध निर्माण होतील. वैभवला मोठी भूमिका देण्याची घाई करण्याची गरज नाही.”

जिओस्टारशी बोलताना अय्यर म्हणाला, “मी वैभवशी मैदानाबाहेरील गोष्टींबद्दल बोलत असतो, कारण प्रत्येकजण त्याच्याशी क्रिकेटबद्दल बोलतो आणि एक खेळाडू म्हणून तो किती प्रतिभावान आणि सक्षम आहे हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच तो त्याच्या मैदानाबाहेरील जीवनशैली, त्याचे कुटुंब, तो काय करतो आणि काय करत नाही याबद्दल बोलण्यास अधिक उत्सुक असतो, कारण या विषयांवर चर्चा करताना तो अधिक सहज आणि प्रामाणिकपणे बोलतो.”

कर्णधाराने हे देखील स्पष्ट केले की, वैभवला वगळले जात आहे याचा अर्थ असा नाही तो सक्षम नाही, पण सध्या त्याला संधी मिळणं अवघड दिसत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाला टी-२० आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर, श्रेयस अय्यर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतही तीच लय कायम ठेवून मालिका लवकर जिंकण्याचा प्रयत्न करेल. आता ६ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि १० ऑक्टोबरला हे तीन टी-२० सामने रंगतील.

Follow Us
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल